प्रेमानेही मुलाला दचकवू नका

Date: 
Sun, 4 Mar 2012

प्रेमानेही मुलाा दचकवू नका
उपेक्षी कदा रामरूपीं असेना।
जिवंा मानवां निश्चयी तो वसेना।।
शिरीं भार वाहेन बोले पुराणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।34।।
गणपतीचे दिवस आले की रामाच्या देवळात गणपतीची आरास सुरू होते. म्हणजे मनुष्य गणपतीप्रिय असतो का उत्सवप्रिय असतो? वास्तविक मूलत: गणेशशक्ति आणि रामशक्ति, दोन्ही उत्तम थरावरच स्थित आहेत. पण ती उंची जाणून काही रामाच्या मंदिरात दहा दिवसांसाठी गणेशस्थापना होत नाही. मनुष्य सदा दु:खाला भितो. म्हणून तो एकाच वेळेला दहा देवांना नवस करतो आणि एखाद्या पिरालासुध्दा करील. मरीला नवस करील. मेरीलासुध्दा करील. कारण माणसाला दु:खातून सुटण्याची घाई झालेली असते.
तेव्हा सगळे देव एकच मानण्याचा मुद्दा नाही, तर मुद्दा आहे तो या अतिरेकी, उबग आणणाऱ्या घाईचा. संकटाचे, दु:खाचे कारण शांतपणे समजावून घेऊन ते दूर करणे हे खरे हिताचे. पण तेवढा धीर निघाला नाही की मनुष्य आणखी गोंधळात पडतो. छोटे मूल विहिरीवर निरागसपणे डोकावत असताना, ‘अरे कार्ट्या-‘ म्हणून त्याला दचकवण्यात काय अर्थ आहे? प्रेमाच्या नावाखाली विवेक आयत्या वेळी जात असेल तर ते प्रेम काय कामाचे? नाग पाहिला तर गोंधळून धावाधाव करून, त्याच्या शेपटीवर पाय पडण्याचा धोका धांदरट मनुष्य घेतो. अशा वेळी शांती आवश्यक असते.
पण शांती ही एकाएकी येणारी गोष्ट नाही. ती सवडीने येणारी गोष्ट आहेह. शांतीची सवय मनुष्याच्या निश्चयाशिवाय होणारच नाही. म्हणून श्रीरामदास स्वामी म्हणतात की, राम कधी भक्ताची उपेक्षा करणार नाही. आता रामाची भक्ती करण्याचा तुमचा निश्चय झाला की नाही, हे तुमचे तुम्ही पाहून घ्या. श्लोकाची तिसरी ओळ स्पष्ट करते की, रामाने प्राचीन काळातच वचन दिले आहे. त्याच्यावर श्रध्दा ठेवणाऱ्याचा भार त्याने घेतला आहे. गीतेमध्ये ‘योगक्षेमं वहाम्यहं’ असे वचन नवव्या अध्यायात तेविसाव्या श्लोकात कृष्णाने दिले आहे. राम आणि कृष्ण एकच आहेत, हे रामदासांनी दुसऱ्या श्लोकात दर्शविले आहे. तसेच पुढे सदतिसाव्या श्लोकातही सुचवले आहे. इतरत्र ते आहेच.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView