बुद्धिवर्धन - बालसमस्या

बुद्धीवर्धन संस्कार शिबिर (वयोगट ८ ते १४ वर्षे) :-
हुशार मुलांनासुद्धा नकळत अभ्यासाचा ताण पडतो, असे संशोधन सांगते. तर मग इतर मुलांची काळजी घायलाच हवी. पण ही काळजी अभ्यासापुरतीच नाही, तर यात विषय येतात-
• पालकांशी कसे वागावे ?
• मुलांनी एकाग्रता शक्ती कशी वाढवावी?
• कलागुण कसे बाणवावे ?
• शिक्षकांना योग्य आदर देण्याचे पथ्य कशासाठी आहे?
• प्रत्येक विषयात म्हणजे अभ्यासाबरोबर खेळातही रस घेण्याच्या युक्त्या.
• ‘झोपेतून शिक्षण’ (Sleep teaching)

रशिया, अमेरिका इत्यादी प्रगत देशातील ‘झोपेतून शिक्षण’ हे प्रयोग, भारतात जुळवून घेऊन मुलांच्या अभ्यासात क्रांती करणारे; अभिनव, प्रभावी या सर्व अभ्यासाचा अपूर्व मेळ म्हणजे बुद्धीवर्धन अभ्यासवर्ग.
(महत्वाची सूचना : मुलांसोबत किमान एका पालकाने तरी `बालसमस्या' हा वर्ग करणे बंधनकारक आहे.)

बालसमस्या (पालकांसाठी):-
८ ते १४ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी बालसमस्या हा वर्ग असतो.

मुलांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमता वाढीचा हा काळ. वर्तनातले बदलही ह्या कालावधीत होत असतात. या मुलांना एका बाजूने आई-वडिलांच्या अपेक्षांचे ताण असतात. दुसऱ्या बाजूने स्पर्धेच्या युगात टिकायचे असते. तिसऱ्या बाजूने आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवणूक करून घ्यायची असते. उमलण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या मुलांना कसे समजावून घ्यायचे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर स्वभाव व आरोग्य यांमध्ये समतोल कसा आणायचा, तसेच मुलांच्या निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांवर वैज्ञानिक व मानसशास्त्रीय उपाय कोणते करायचे, याबाबतचे मार्गदर्शन ह्या वर्गामध्ये केले जाते.
थोडक्‍यात, मुलांच्या समस्याही सोडवण्याचे उपाय सांगणारा, पालकांसाठीचा हा खास वर्ग आहे.

कालावधी : ३ दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ विद्यार्थी - रु. ७८५ /- + १ पालक - रु ११५०/- = रु.१९३५/-
ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

&nbsp

बुद्धिवर्धन - बालसमस्या - 01/05/18 लोणावळा 01/05/2018 - 03/05/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
बुद्धिवर्धन - बालसमस्या - 05/05/18 लोणावळा 05/05/2018 - 07/05/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
बुद्धिवर्धन - बालसमस्या - 13/05/18 लोणावळा 13/05/2018 - 15/05/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
बुद्धिवर्धन - बालसमस्या - 17/05/18 लोणावळा 17/05/2018 - 19/05/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
बुद्धिवर्धन - बालसमस्या - 04/06/18 लोणावळा 04/06/2018 - 06/06/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
बुद्धिवर्धन - बालसमस्या
बुद्धिवर्धन - बालसमस्या
बुद्धिवर्धन - बालसमस्या
बुद्धिवर्धन - बालसमस्या

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView