माणसाला सगळ्यात जास्त भीति वाटते ती `मृत्यूची'! पण मृत्यूच्या वेळी खरोखरंच जीवन ``संपतं' का? की मृत्युनंतरही जीवन असतं? आयुष्यातील घटनांचा आणि संस्कारांचा, मृत्युपश्चात आयुष्यात कसा परिणाम होतो? मृत्युनंतरच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून कसे वागावे? जन्म आणि मृत्यू हे मनाच्याच इच्छेने होतात हे कसे? पुनजर्न्म - स्वर्ग - नर्क - मोक्ष - समाधी याचे बुद्धिनिष्ठ अर्थ काय? या आणि अशा प्रश्नांचे रहस्य, गणित, पदार्थविज्ञानशास्त्र, तर्क, वैद्यकशास्त्र याआधारे, मनशक्ती केंद्राच्या पुढील उपक्रमांत, साहित्यांत आणि उत्पादनांमध्ये उलगडलेले आहे.