ताण व्यवस्थापन कार्यशाळा (चाचणीसह)

ही कार्यशाळा मुख्यत: कॉर्पोरेट सेक्‍्टरसाठी घेतली जाते.

आत्तापर्यंत पुढील कंपन्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे -

 • पार्ले बिस्किटस्‌ प्रा. लि.
 • कॅडबरी इंडिया लि.
 • हिंदुस्थान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लि.
 • भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लि.
 • एमटीएन्‌एल्‌ मुंबर्इ
 • आय.एन.ए. बेअरिंग्ज इंडिया प्रा. लि.
 • महिंद्र युजीन स्टील कंपनी लि.
 • एजिस लॉजिस्टिक्स्ी‌ लि.
 • रिलायन्स्‌ लार्इफ इन्शूरन्स्‌ कंपनी लि.
 • ग्रीव्हज्‌ कॉटन कंपनी लि.
 • भारतीय सैन्यदल (जम्मू)
 • डीएच्‌एल्‌ एक्स्प्रे स (आय्‌) प्रा. लि.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये

 • आयुष्यातील ताणांची कारणे व परिणाम
 • नैराश्य - काळजी - ताण मापन चाचणी
 • संगणकीय निष्कर्ष
 • शरीराशी संवाद (ध्यान प्रात्यक्षिक) इ.

कार्यशाळेत कोण सहभाग घेऊ शकतो?

 • कामगार
 • कर्मचारी
 • सुपरवायझर
 • अधिकारी
 • व्यवस्थापक
 • एक्झिक्युटिव्हज्‌
 • मॅन्युफॅक्चकरिंग/सर्विस/आयटी इंडस्ट्रिज्‌
 • बिझनेस हाऊसेस्‌
 • शैक्षणिक संस्था
 • रोटरी क्लिब
 • लायन्स्‌ क्ल्ब इ.

यश, पैसा आणि सत्ता यासाठी चाललेल्या पाशवी स्पर्धेत, लोकं आपल्या सर्व क्षमता पणास लावत आहेत. याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे ‘ताण’. आयुष्याची घडी विस्कटून टाकणारा आणि मनो-शारीरिक व्याधींना आमंत्रण देणारा! अलिकडेच जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवले आहे की, नजीकच्या काळात मानसिक व्याधींचे मुख्य कारण ‘ताण’ हे असणार आहे! पण ह्याच ताणाची चांगली बाजूही आहे.

उत्क्रांतीमध्ये, ताणामुळेच आपण आजवरची प्रगती करू शकलो. पण सध्याच्या जमान्यात, भौतिक सुखाच्या अतिरेकी हव्यासामुळे केवळ आरोग्यच नाही तर एकूणच आयुष्याची घुसमट होते आहे. म्हणजेच ताणाचे स्वरूप प्रेरणादायी न राहाता विनाशकारी होत चालले आहे! त्यावर मात करण्यासाठी आणि ताणाला योग्य तर्हेोने हाताळण्यासाठी, मनशक्ती प्रयोगकेंद्राने नाविन्यपूर्ण ‘‘ताण व्यवस्थापन कार्यशाळा’’ सुरु केली आहे. मनशक्तीचे अनुभवी ज्येष्ठ साधक ही कार्यशाळा घेतात. कंपनी/ संघटना/संस्था यातील सर्व स्तरांवरील लोकांना ती उपयुक्त आहे.

 • भाषा : मराठी, इंग्रजी
 • कालावधी : ७ ते ८ तास
 • देणगीमूल्य : रु. 1040/- प्रति व्यक्तीस

&nbsp

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

ताणमुक्ती कार्यशाळा (इंग्रजी
ताणमुक्ती कार्यशाळा (इंग्रजी)
ताणमुक्ती व ध्यान कार्यशाळा

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView