रोगमुक्ती कार्यशाळा

रोगमुक्ती कार्यशाळा

स्वामी विज्ञानानंद (संस्थापक, मनशक्ती) यांनी मानवी आजार, रोग, बिघाड आदींचा शास्त्रीय - विशेषत: पेशीविज्ञानाच्या दृष्टिकोनातून - अभ्यास करून, रोगमुक्ती आणि आरोग्य सातत्यासाठी, एकविसाव्या शतकासाठीची बुद्धिनिष्ठ व अत्यंत अभिनव अशी एक नवीन पॅथी समाजासमोर मांडली- ती म्हणजे ‘रेसिप्रोपॅथी’. त्यावर आधारित एक दिवसीय ‘रोगमुक्ती कार्यशाळा’, जानेवारी २०१६ पासून सुरु होत आहे

चौदा वर्ष पूर्ण असलेल्या युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही यात भाग घेऊ शकतो. आजारी व्यक्तींबरोबरच निरोगी व्यक्तींनीही आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी, शारीरिक-मानसिक धैर्य वाढावे यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.

माईंड पॉवर, क्युअर विदाउट मेडिसन, डेथ ऑफ डिसीज्, क्युअर युवरसेल्फ, डियर मिस्टर बॉस, रिच अ‍ॅम्बिशस् हेल्दी, यज्ञकथा, रोगमुक्ती मंत्र, व्याधीनाश मंत्र अशा अनेकविध ग्रंथांमधून, स्वामीजींनी, रोगमुक्ती आणि मन:स्वास्थ्य याबद्दलचे विविध सिद्धांत मांडलेले आहेत.

स्वामीजींनी मांडलेले सिद्धांत आणि त्यांनी दिलेले रोगमुक्तीचे सोपे उपाय सांगणारा चार दिवसांचा रोगमुक्तीविज्ञान अभ्यासवर्ग, लोणावळ्याच्या मुख्य मनशक्ती प्रयोगकेंद्रात सर्वांसाठी उपलब्ध आहेच. तथापि, या अभ्यासवर्गातील महत्वाचा सारांश आणि उपाय देणारी १ दिवसीय ‘रोगमुक्ती कार्यशाळा’ जानेवारी २०१६ पासून आपल्या शहरात सुरु होणार आह.

वैशिष्ट्ये

  • रेसिप्रोपॅथी
  • पेशी प्रार्थना
  • वेदना सुसह्य कशा होतील?
  • व्यसनमुक्तीसाठी वनस्पती प्रयोग
  • ध्यान इत्यादी

विविध उपाय या कार्यशाळेत सांगितले जाणार आहेत. हे उपाय घरच्या घरी विनामूल्य पद्धतीने करता येतात. आजार बरा होणे, त्याची तीव्रता कमी होणे, वेदना कमी होणे, मनाचा उत्साह वाढणे असे अनुभव या उपायांमुळे येऊ शकतात.

कार्यशाळेत कोण सहभागी होऊ शकते?- चौदा वर्ष पूर्ण असलेल्या युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत
भाषा : मराठी
कालावधी : सुमारे सात तास
देणगीमूल्य: रु. ४२०/-

&nbsp

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView