व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

आयुष्यात कर्तबगारी करायची आहे का ?
आत्मविश्वारस वाढविणे महत्त्वाचे वाटते का ?
तुमच्यातले न्यूनगंड तुम्हाला त्रास देतात का ?
नकारी भूमिका सोडून होकारी भूमिका वाढवायची आहे का ?
एकाग्रता, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी वैज्ञानिक उपाय हवे आहेत का ?
तुम्ही खूप हूशार असूनसुद्धा अभ्यासाचा/कामाचा ताण येतो का ?

आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण असावे असे आपल्याला मनापासून वाटते. त्यासाठी काय आवश्यक आहे? नेमके कोणते प्रयत्न करावेत? याचे उत्तम शास्त्रशुद्ध उपाय मनशक्ती केंद्राने या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत सुचविले आहेत. तसेच या विषयासंबंधित प्रदर्शन व ग्रंथसाहित्य कार्यक्रम स्थळी उपलब्ध असते.

युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे, असा या केंद्राचा विश्वास आहे. योग्य पद्धतीने सुसंस्कृत, सुविद्य व सक्षम होऊन राष्ट्र निर्मितीसाठीच्या प्रयत्नात युवक भक्कम आधार कसा होऊ शकेल, यासाठी अनेक पद्धतीने संशोधन केले जाते. तसेच युवकांसाठी विविध उपक्रमही राबविले जातात. त्यातलाच एक भाग म्हणून ही व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आहे.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये –

  • व्यक्तिमत्वाचा अर्थ आणि व्याप्ती
  • जीवनाची ध्येयनिश्चि ती
  • व्यक्तिमत्व विकासाने यश संपादन
  • अभ्यासाच्या सोप्या युक्त्या
  • आयुष्यातील उत्कृष्टत्व साधण्याच्या पद्धती.

वयोगटः १५ ते २८ वर्षे
कार्यशाळेची भाषाः मराठी
कालावधीः सुमारे 7 तास
देणगीमूल्य: रु. 520/- (एक युवक )

&nbsp

व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा - 01/07/18 अहमदनगर 01/07/2018 शिल्लक श्रीमती.पटारे- ९४२२३१५६३३, ९४२३१६५२११ Add to Cart
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा - 22/07/18 नाशिक 22/07/2018 शिल्लक श्रीमती. देशमुख - ९४०३११७४१२, श्री. वैद्य -९४२३९२४२१५ Add to Cart
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा - 15/08/18 खारघर 15/08/2018 शिल्लक ऑफिस - ९९६९९३८८५१ , श्री. पुळेकर ८८७९४५०१६१ Add to Cart

‘‘व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला उपस्थित राहून मला खरंच खूप आनंद होत आहे. काही दिवसांपासून मी जे नैराश्य ‘फेस’ करत आहे, ते कुठेतरी दूर पळून गेल्यासारखं वाटतंय. मी प्रथमच असा कार्यक्रम ‘अटेंड’ केला आहे. माझ्या अनेक प्रश्नां ना उत्तरं मिळाली आणि खूप समाधानसुद्धा मिळाले. बुद्धिवर्धन पद्धत, मेंदूव्यायाम व इतर पद्धतीसुद्धा मी अंमलात आणायचे ठरवले आहे.’’ - भाग्यश्री प्रमोद सुर्वे, कल्याण

‘‘मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा मला आकर्षक वाटली. इथे आपले भविष्य घडवण्याचा मार्ग दाखवला जातो. मनशक्ती म्हणजे मनाची शक्ती. मनातील इच्छांचा मार्ग मोकळा होतो. मनशक्तीच्या या कार्यशाळेमुळे मी अतिशय प्रभावी झालो आहे.’’ अमोल नाईक, पुणे

व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView