प्रकाशने

मनशक्ती संशोधन केंद्राने शास्त्रीय तत्त्वावर केलेले अनेकविध प्रयोग, जीवनविषयक तत्त्वज्ञान सर्वसामान्या माणसांना समजेल अशा सोप्या भाषेत सातत्याने प्रसिध्द केले आहे.

मन:शांती मिळविण्याकरिता करण्यात येणाऱ्या प्रयोगांची उत्सुकतेने माहिती घेणाऱ्या अभ्यासकांकरिता, लहान लहान विषयांवर प्रकाशने निघण्याची नितांत गरज भासली म्हणून 1993मध्ये एक छोटा छापखाना सुरू केला. अगदी साधा लेटर प्रेस होता. मजकूर खिळे जुळवून तयार होत असे. त्यानंतर छपाई तंत्रात वेळोवेळी होणाऱ्या प्रगतीची जाणीव ठेऊन यंत्रसामग्रीमध्ये नूतनीकरण करण्यात आले. टेबलटॉप संगणकाचा भारतात वापर सुरू झाल्यानंतर 1986साली लोणावळे येथे संगणकावर मराठी टाईपसेंटिंग सुरू झाले. त्याकाळी मुंबई-पुणे या महत्त्वाच्या शहरातसुध्दा मराठी टाईपसेटिंगचा वापर अभावानेच होत होता. अशा वेळी लोणावळ्यासारख्या ठिकाणी संगणकाधारित मराठी टाईपसेटिंग सुरू करण्यात यश मिळाले.

संगणकाधारित टाईपसेटिंगमुळे मजकुरामध्ये सुबकता, सौंदर्य, नाविन्यता व कमी वेळात मजकूर जुळवण्याची सोय झाली. स्वामीजींचा विचार व लिखाणाचा वेग इतका प्रचंड होता की त्यासाठी पूर्वीची खिळे जुळवणुकीची पध्दत पुरी पडत नव्हती. संगणकाधारित कंपोझिंगमुळे स्वामीजींनी पुन्हा नव्याने लिखाणास सुरुवात केली व योगग्रंथांची मालिका आकारास आली. कंपोझिंगसाठी घेतलेल्या संगणकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत गेली.

1990मध्ये स्विफ्ट कंपनीचे 15” 20” आकाराचे ऑफसेट छपाई मशीन विकत घेतले. या मशीनचा होणारा वापर एवढा वाढला की त्यामुळे पुढच्याच वर्षी आणखीन एक तसेच छपाई मशीन घ्यावे लागले. बाह्य उपक्रम, लोणावळ्यातील अभ्यासवर्ग, शाळा-शाळातून होणाऱ्या बैठका यामुळे स्वामीजींच्या पुस्तकांची मागणी प्रचंड वाढली आणि 1995साली 22” 32” आकाराचे तिसरे मोठे जपानी ऑफसेट छपाई यंत्र बसविण्यात आले.

आज सर्व छपाई विभाग मन:शांती कॉलनीवर नेण्यात आला आहे. छपाई झालेले कागद घडी घालण्यासाठी, 2000सालच्या सुरुवातील घेतलेले फोल्डिंग मशीन तेथे कार्यरत आहे. त्याशिवाय पिनिंग, बाईंडडिंग, कटिंग ही कामेही तेथेच होतात. तयार ग्रंथांची व्यवस्थीशीर साठवणही तेथेच होते. आश्रमसंबंधित उपक्रमांची रंगीत छायाचित्र घेण्यासाठी अद्ययावत डिजिटल कॅमेरासुध्दा आता प्रयोगकेंद्राकडे उपलब्ध आहे.

पुस्तके, दिवाळी अंकमासिक मुखपत्राची माहिती येथे मिळेल.

मनशांतीः-१६-सोप्या-पद्धती पुस्तके

स्वामीजींच्या बहुव्यापी संशोधनातून आणि अनुभवातून साकारली आहे, २५० हून अधिक ग्रंथांची न्यू वे साहित्य ग्रंथमाला. रंजक, उद्बोधक, जीवनाला नवी दिशा देणारी. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ताणमुक्त यश आणि नि:शाप सुख मिळविण्याच्या युक्तया सांगणारी. बुध्दिवाद हा यातील प्रत्येक ग्रंथाचा आधार आहे. विज्ञान, विवेचन, संशोधनात्मक, तत्वविश्‍लेषक इत्यादि बहुविध साहित्य प्रकारांनी समृध्द व माणसाला समर्थ करणारे असे हे संजीवक साहित्य.

Magazine मासिक

मनशक्ती केंद्र गेली २५ वर्षे 'मनशक्ती' हे मुखपत्र मासिक-पाठांच्या स्वरूपात प्रसिद्ध करीत आहे. कोणत्याही प्रकारची व्यावसायिक प्रसिद्धी न करताना, राशीभविष्य आणि जाहिराती टाळून सुमारे ३५००० वर्गणीदार असलेले हे एकमेव मासिक पाठ म्हणता येतील. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला उपयुक्त, मनाची शक्ती आणि शांती वाढविणारे हे अत्यंत लोकप्रिय मासिक पाठ आहेत.

Diwali दिवाळी अंक

मनशक्ती केंद्र गेली ३५ वर्षे - १९७७ सालापासून दिवाळी अंक प्रकाशित करीत आहे. त्याचे सुमारे ३०,००० च्या वर वर्गणादार आहेत. स्वामीजींच्या अभ्यास - संशोधन - प्रयोग आणि अनुभवांवर आधारीत विविध अभ्यासात्मक लेखमाला यामध्ये वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचबरोबर तत्कालीन वैज्ञानिक, सामाजिक, आध्यात्मिक इ. विषयांवरही अत्यंत दर्जेदार लेख, माहितीही यामध्ये असते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView