जगाच्या जन्माबद्दल शंका!

Date: 
रवि, 15 मार्च 2015

मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें।
दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचें।
तया खूण ते हीण दृष्टांत पाहे।
तेथे संग नि:संग दोनी न साहे।।192।।

एक सुरेख संवाद आहे. एका तत्ववेत्त्याला जिज्ञासूने प्रश्र्न विचारला, “कर्मसिध्दांत असे सांगतो की, आपल्या मागल्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळते. मग त्या मागल्या कर्माचे मूळ कुठले?आणि त्या मूळाचे मूळ? “ यावर तो तत्ववेत्ता म्हणला, “समजा, तुम्ही एखाद्या मोठ्या नदीच्या काठाशी उभे आहात आणि तुम्हाला नदी ओलांडून जावयाचे आहे. आता तुम्ही पलीकडे जाण्यासाठी एखादी नाव मिळते का ते पहाल. नाव धुंडून काढाल. नावेचा दर ठरवाल. पण तुम्ही असे म्हणाल का, ही नदी मुळात कोठून आली हे समजल्याशिवाय मी ती ओलांडणार नाही? “
गेले तीन श्र्लोक आपण बघितले की, जगाचा जन्म हा कसा झाला, याबद्दल विज्ञानाचा निश्र्चय अजून झाला नाही. आणि तत्वज्ञानाच निश्र्चय असा आहे की, जग जन्मले, ते माणसाचे मन प्रथम चंचल झाले तेव्हा. आता यावर शंका येते की सगळ्यांची मने एकदमच चंचल झाली का? ब्रह्मापासून ती एकदम अलग झाली कशी? आणि या सगळ्याला पुरावा काय? या सगळ्याला एका तत्ववेत्त्याने वर सांगितलेली मर्मग्राही गोष्ट आठवावी. तेव्हा हा श्र्लोक दाखवीत असलेली अपूर्णता गृहीत धरूनच आपण उध्दाराचा उपाय केला पाहिजे.

मनाला आपण स्वत: कोण हे कळत नाही. या पार्श्र्वभूमीवर श्र्लोकाची पहिली ओळ म्हणते की, मनाला सर्वोत्तम रामाचे स्वरूप कळत नाही. पण त्याला रूपच नाही म्हणावे, तर त्याचे कार्य सर्वत्र दिसते. मग तिसरी आणि चौथी ओळ म्हणते की, असे कार्य करणाऱ्याला कर्त्याला पाहण्यासाठी एखादी खूण पहावयाला जावे, तर कोणतीही उपमा तेथे हीनच ठरते. कारण ‘तो स्वत: असतो आणि नसतो. ‘ ‘संग आणि निसंग ‘या दोन्ही पलीकडे तो आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
लेकुरां नाही वाढवितें। अन्न करावें लागे आपुलेन हातें।
बहु त्रास घेतला चित्तें। स्वयंपाकाचा।।
लोकी भरीस घातलें। पुन्हा मागुतें लग्न केलें।
द्रव्य होतें तें वेचलें। लग्नाकारणें।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView