नकुलाची गोष्ट

Date: 
रवि, 22 डिसें 2013

धर्मराजाने युध्द जिंकल्यावर यज्ञ केला. तेव्हा मोठ्यामोठ्या पंक्ती उठत होत्या. आपल्या औदार्याचा धर्मराजाला गर्व झाला. कृष्णराजाने ते ओळखले आणि त्याला बाहेर नेले. उकिरड्यावर एक मुंगुस लोळत होते. त्याचे नाव नकुल. त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. मुंगुसाला विचारले तेव्हा त्याने आपली कथा सांगितली. तो म्हणाला, “पूर्वी एक गरीब कुटुब होते. ते त्याला बराच उपवास पडला. मग त्याला अगदी थोडे अन्न मिळाले. ते आपसात घेऊन ते कुटंब वाटून खाणार एवढ्यात मी तेथे गेलो, आणि अन्न मागू लागलो. त्या भुकेल्या जीवंानी आपला घास काढून मला दिला. म्हणून माझे अर्धे अंग सोन्याचे झाले. तसाच कोणी आता श्रेष्ठ दाता मिळाला तर माझे उरलेले अंगही सोन्याचे होईल. म्हणून मी येथे लोळतो आहे. पण त्याचा उपयोग तर काही दिसत नाही. “ही गोष्ट ऐकली आणि धर्माची मान शरमेने खाली झाली. सत्कृत्याला गर्व शोभत नाही.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView