पाप आणि पुण्य

Date: 
रवि, 8 डिसें 2013

सेनापती बापट भूमिगत असतानाची गोष्ट आहे. त्यांच्या मागे सरकारी अधिकारी लागले होते. आणि सेनापती बापट त्यांना चुकवत पळत होते. एका आडरस्त्याला, एक बाई नाहात होती. तिची कीर्ती काही चांगली नाही, हे सेनापती बापटांना माहीत होते. तिच्याबद्दल लोकांचे वाईट मत होते. ती उघड उघड वाईट गोष्टी करतच होती. सेनापती बापट पाठलाग चुकवीत सरळ या घरात शिरले. आपण कोण हे त्यांनी त्या बाईला सांगितले. देशासाठी त्याग करत असलेला एक थोर पुरूष आपल्या मदतीसाठी आला आहे, हे पाहून त्या बाईला धन्य वाटले. तिने दोन घाणेरडी वस्त्रे सेनापतींच्या कडे टाकली. आणि त्यांचा उपयोग करून साध्या घरगड्याच्या वेषात सेनापती सजले, पण या काही मिनिटातच पोली अधिकारी तेथे येऊन ठाकले. “येथे शिरलेला माणूस कोठे गेला? “असे त्यांनी विचारले. बापटांनी घरगड्याच्या वेषात चहाचे कप आणून दिले. ते अधिकाऱ्यांनी घेतले, पण प्रश्र्न काही सोडले नाहीत. शेवटी त्या बाईला त्यंानी खूप मारले. त्या बाईचे उत्तर एकच होते, “येथे कोणी आलेच नाही. “ पोलीस अधिकारी निघून गेले आणि बापटांनी त्या बाईल गहिवरून म्हटले, “बाई, तुम्हाला इतर कोणी काही म्हणोत, पण माझ्या दृष्टीने तुम्ही पुण्यवान आहात. “

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView