पारा, माकड आणि बीज

Date: 
रवि, 9 ऑक्टो 2011

पारा, माकड आणि वीज
मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात तें सर्वें बुडालें।।
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी।
बळें लागला काळ हा पाठिलागीं।13।।
पारा, माकड आणि वीज या तिघांचे रसायन एकत्र केले तरी त्याला मनाच्या चंचलतेची बरोबरी करता येणार नाही. या मनाची चंचलता सुखाचे टोक गाठण्यासाठी असते. म्हणून तेराव्या श्लोकात रामदास मनाची सुखलालसा ज्ञानरूप करीत आहेत. रामदास दाखला देतात, अरे रावण हा तर सुखाच्या शिखरावर होता ना? मग त्याचे काय झाले? चौदा चौकड्यांचे राज्य चौदा दिवसातं आटोपले. सर्वसम्राट रावणाची ही कथा, तर क्षुद्र मानवाने आधीच सावध झाले पाहिजे. काळाने बळी घेण्यापूर्वीच ही काळजी घेतली पाहिजे.
मागे या श्लोकावर विवरण करताना म्हटले होते, एक विपरित गोष्ट आहे. रामरावण युध्दात एकमेकांची गाठ पडेपर्यंत बहुतांंशी रामाला कधी सरळ सुख किंवा जय मिळाला नाही.
उलट रामाची तेथे गाठ पडेपर्यंत, रावणाला कधी फारते असुख किंवा पराभव पत्करावला लागला नाही. रावणाला चांगले चौदा चौकड्यांचे राज्य होते. मंदोदरीसारखी पतिव्रता पत्नी होती. इंद्रजीतसारखा शूर आणि तत्पर मुलगा होता. कुंभकर्णासारखा सुस्वभावी (म्हणूनच जागेपणापेक्षा झोपून राहण्यात आणि रावणाच्या नादी न लागण्यात आनंद मानणारा, पण परिणामी, रावणाच्या आडही न येणारा) भाऊ होता. अफाट आणि आज्ञाधारक सेना दिमतीला होती. वाटेल ते रूप बदलता यावे अशी विलक्षण शक्ती होती. त्याला काय कमी होते?
उलट रामाची गोष्ट पहा. लहानपणी राक्षसांपासून संरक्षण देण्यासाठी, लढण्याच्या निमित्ताने त्याला वनात जावे लागले. सीता मिळाली, पण हक्काचे सिंहासन गमावले.आणि पुन्हा वनवास नशिबाला आला. तेथे पहाव, तो सीताच रावणाने पळवण्यात यश मिळवले. पुढे उभे राहिले वाली-सुग्रीवाचे युध्द. वालीला मारण्यात रामाला जय मिळाला खरा, पण त्या विजयाच्या अनैतिकपणाबद्दलचा आक्रोश आजतागायतचे टीकाकार विसरले नाहीत. लढाईतला सहकारी कोण, तर माणूसपणापर्यंत न पोचलेली वानरे! युध्दातसुध्दा कितीतरी रामवीर आणि लक्ष्मणासारखा सहकारीही, युध्दाचे घाव सोसत राहिले.
चर्चिलने म्हटले की, आम्ही मधल्या चकमकी हरू, पण युध्द जिंकूच. तसे असत्य हे विशाल वैभवाच्या रूपाने विहार करताना दिसते, तरी अखेरचा विजय सत्याचाच होतो.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView