पुरणपोळीची गोष्ट

Date: 
रवि, 30 मार्च 2014

कळेना कळेना कळेना ढळेना।
ढळे नाढळें संशयो ही ढळेना।
गळेना गळेना अहंता गळेना।
बळें आकळेना मिळेना मिळेना।।142।।

गोष्ट तशी जुनीच आहे. एका स्त्रीला घरात म्हणजे माहेरी स्वयंपाकाची सवय लागली नाही. खाऊन पिऊन सुखी होती. सासरी आली. मग नवऱ्याने पुरणाच्या पोळ्या करावयास सांगितल्या. आता ‘मला पुरणाच्या पोळ्या येत नाहीत’असे सांगावयास तिचा अहंकार आडवा येऊ लागला. त्यात अपमान वाटावयास लागला. तेव्हा ही उठून शेजारणीकडे गेली आणि म्हणाली, ‘मला पुरणाच्या पोळ्या करावयास येतात. परंतु आता त्या करून बरेच दिवस झाले. तेव्हा तुम्हाला विचारून घेते. कशा करावयाच्या ते सांगा. ‘ शेजारीण सांगू लागली - ‘हरभऱ्याची डाळ घ्यावी. ती चांगली धुवावी मग.. ‘पुढे शेजारणीचे एक वाक्य संपले की ही बाई म्हणे - ‘हो! ते मला माहीत आहे, पुढे सांगा. ‘

असे पाचसहा वेळा झाल्यानंतर शेजारणीने तिचा अहंकार व अज्ञान दोन्हीही ओळखले. आणि तिची खोड मोडावी म्हणून पुरणाच्या पोळीची कृती भलतीच सांगितली. ‘गुळाएवढे मीठ घ्यावे, ते टाकावे. नंतर डाळीच्या पिठात कणकेचा गोळा टाका, इत्यादी. ‘अशी कृती सांगितल्यावर पुरणाच्या पोळ्या कशा होणार? परंतु त्यावरही ही बाई ‘हो! हो! असेच’म्हणत राहिली. पोळ्या करावयास बसली. अर्थात् नवऱ्यास पोळ्या काही खाण्यास मिळाल्या नाहीत. परंतु या बाईला शिव्या मात्र खाव्या लागल्या. या दृष्टान्त कथेप्रमाणे रामदास सांगत आहेत की, आपल्या मनाला, स्वत:ला कळत नाही. परंतु दुसऱ्या बाजूने अज्ञानाच्या प्रेमाबद्दलही आपण नि:शंक राहतो. अहंकार गळत नाही. नष्ट होत नाही. तोपर्यंत नुसत्याच हट्टाने काही ज्ञान पदरात पडत नाही.

मनोबोधाचे ओवीरूप
आता लेंकुराचें मुख देखेन। तरी आनंदे राडी चालेन।
आणि गळही टोचिन। कुळस्वामिणीपासीं।।
आई भुता करीन तुझा। नाव ठेवीन केरपुंजा।
वेसणी घालीन माझा। मनोरथ पुरवी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView