पूर्वजांचा श्रेष्ठपणा

Date: 
रवि, 9 मार्च 2014

पुढे पाहतां सर्व हि कोंदलेंसे।
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे।
अभावें कदा पुण्य गांठी पडेना।
जुने ठेवणे मीपणें आकळेना।।139।।
मागच्या श्र्लोकाच्या संदर्भात श्रीरामदास पुढे विवेचन करीत आहेत. आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाची श्रेष्ठता अभागीपणामुळे आपल्याला दिसत नाही. हिपोक्रॅटस्च्या पूर्वीही आपल्या पूर्वजांनी माणसांच्या वृत्तीचे चार वर्ग केले आहेत. ते आपल्या लक्षात का येत नाहीत, तर ते ज्ञान होण्यास दुर्दैव आड येते एवढेच.

दुर्दैव बदलण्याचे आपल्या हातात असून आपण भयामुळे, तमोगुणामुळे ते नाकारीत राहतो, हे आपले दुसरे दुदैव होय. भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान प्रथमपासून स्पष्ट केले आहे. गुणदोषांची चर्चा केली आहे.
माणसाने सृष्टीमधले काय टाकावे आणि काय घ्यावे, याच्या स्पष्ट सूचना आपल्या तत्ववेत्त्यांनी देऊन ठेवल्या आहेत. पण फुटक्या नशिबाच्या माणसाचे तिकडे लक्ष जात नाही. सर्वत्र ज्ञानाचे भांडार उपलब्ध असताना या देशाचे दुर्दैव असे की ते ज्ञान विसरले गेले आहे. पुरून ठेवलेल्या एखाद्या द्रव्याच्या साठ्यावर खुणेचा दगड ठेवावा पण बापाने सांगितलेली खूण विसरून मुलाला तेथे फक्त दगडाचे ज्ञान व्हावे, हे दुर्दैवच! अशासारखा दृष्टांत श्रीरामदास देतात.
भारतीय तत्वज्ञांनाी आणि जुन्या भारतीय तत्वचिंतकांनी माणसाच्या स्वभावाचे चार वर्ग केले. त्या चार वर्गाप्रमाणे माणसाने आपले आत्मशोधन करावयचो तर ते किती सोपे आणि स्वयंसिध्द होऊ शकेल, ते पुढे एकेचाळिसाव्या श्र्लोकांच्या निमित्ताने आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी एकशेचव्वेचाळिसावा श्र्लोक पुढला श्र्लोक, पुन्हा एकदा मागले निष्कर्ष अणि पुढले विवेचन यांचा सांधा जोडून देतो.

मनोबोधाचे ओवीरूप
त्या लेंकुरावरी अति प्रीती। दोघेही क्षण येक न विशंभती।
कांही ज्याला आक्रंदती।दीर्घ स्वरें।।
ऐसी ते दु:खिस्ते। पूजीत होती नाना दैवतें।
तव तेंही मेले अवचितें। पूर्वपापेंकरूनी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView