प्रेम का सेवा!

Date: 
रवि, 21 सप्टें 2014

बरा निश्र्चयो शाश्र्वताचा करावा
म्हणे दास संदेह तो वीसरावा।
घडीनें घडी सार्थकाची करावी।
सदा संगती सज्जनांची धरावी।।167।

मागल्या श्र्लोकात श्रीरामदास सांगत होते की, आपला परिवार वाढविण्यावर भर देऊ नये, त्याचा अहंकार बाळगू नये. पण याच वेळी चालू श्र्लोकाच्या चौथ्या ओळीत सांगत आहेत की, सज्जन संगती धरावी. त्यापैकी हा पाचवा श्र्लोक. दुसऱ्यासाठी सत्

करणारा तो सज्जन, त्याची संगती धरावी, म्हणजे एका बाजूने परक्याबद्दल ममता वाढवू नका, तर दुसऱ्या बाजूने परक्यांची सेवा मात्र करा असे श्रीरामदास सांगत आहेत.
हे बोलणे उलटसुलट नव्हे, कारण सेवेमध्ये कष्ट आहेत; त्यामुळे त्याचा सहजासहजी मोह होणार नाही. उलट सेवेचा मोह, परक्याबद्दल स्वत: झीज सोसण्याचा मोह, ही अत्युत्तम गोष्ट होईल. परस्परविरोधाच्या नियमाप्रमाणे येथे वाईटाचा छेद होईल.
परक्याबद्दल भेदाभेद न करता सेवा केली म्हणजे स्वत:चे कल्याण होते आणि दुसऱ्याचेही होते. बुध्द, गांधी, टिळक, विनोबाजी, साने गुरूजी यांच्यासारख्यांनी स्वत:च्या नातेवाईकांबद्दल मोह ठेवला नाही. सर्वांची श्रेष्ठ सेवा केली. परिणामी त्यांचे लाखो नातेवाईक तयार झाले आणि अहंकारही छाटला गेला. असे दोन्ही बाजूने कल्याण येथे होते.

आजूबाजूच्या लोकांची माया आणि सर्वांची सेवा ह्या दोन्हीतला फरक असा आहे. काही थोड्याच नातेवाईकांच्यावरचे प्रेम ताबडतोब सुख देईल

पण नातेवाईकांचे क्षेत्र विशाल करून त्यांची सेवा केली तर शाश्र्वत कल्याण होईल. अशा शाश्र्वताचा बरा निश्र्चय करावा , अशी या श्र्लोकाची पहिली ओळ, मागल्या श्र्लोकाचा संदर्भ सांगून सांगते कारण दुसऱ्याच ओळीत ‘संदेह ‘ म्हणजे अर्थात् ‘मायेचा संदेह ‘विसरावा, अशी शिकवण आहे. तिसऱ्या ओळीत म्हटले आह की, प्रत्येक क्षण सार्थकी लावा. म्हणजे प्रत्येक क्षण अर्थपूर्ण वर्तन करावे.

मनोबोधाचे ओवीरूप
ऐसा आनंद च्यारी दिवस। सवेंच मांडिली कुसमुस।
म्हणती हें गेलियां आम्हांस। पुन्हा आपदा लागती।
म्हणौनी आणिलें तें असावें। येें मागुतें विदेशास जावें।
आम्ही हे खाऊं न तों यावें। द्रव्य मेळवून।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView