ब्रह्मवेधाची उलटी खूण

Date: 
रवि, 6 जुलै 2014

म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।
अतर्कासि तर्की असा कोण आहे।
जनी मीपणें पाहां पाहवेना।
तया लक्षितां वेगळे राहवेना।।156।।

या श्र्लोकात अपरोक्ष ज्ञानाचीसुध्दा अशक्यता श्रीरामदास सुचवीत आहेत. पहिल्याच ओळीत संागतात की, ब्रह्म जाणले असे सांगणारा मनुष्य मूर्ख आहे. कारण दुसऱ्या ओळीत ते म्हणत आहेत की, तर्कापलीकडचे जे आहे, त्याचा तर्कसुध्दा कसा होऊ शकेल? असा यावर एखादा ताबडतोब विचारील की असे जर आहे, तर श्रीरामदास, ब्रह्माबद्दल तर्क करतात, तेव्हा ते स्वत:ला मूर्ख म्हणवून घेतात का? असा श्रीरामदासांना विचारलेला उलटा प्रश्न अज्ञानाचाच ठरेल.

ज्ञानाच्या चर्चेमध्ये अतिशय उंचीवर असे परस्परविरोध निर्माण होतात. ‘इच्छापूर्ती ‘ ह्या ग्रंथात परिशिष्टातीनल वीस ई या मुद्यात ‘तर्क ‘ हा ईश्र्वररहित अवस्था कशी सुचवितो, याचे विश्र्लेषण आहे. खुद्द नोबेल पारितोषिक विजेता, हायजेनबर्ज, हा क्वांटम-सूक्ष्म ज्ञानात तर्काची ही परिमाणे निराळी असावी असे म्हणतो. या सर्वाचा अर्थ एवढाच की, सूक्ष्म मर्यादेवर बुध्दीचा अहंकार थिटा पडतो. तर्कबुध्दी ही अहंकार सोडून चालविली तर श्रीरामदासंाचा विरोध नाही, हे तिसऱ्या व चौथ्या ओळीवरू स्पष्ट आहे. तिसरी ओळ म्हणते, अहंकार सोडा आणि चौथी ओळ सांगते की तसे सोडून तुम्ही ब्रह्मवेध घेतला, तर तुम्हाला ह्या उलट्या खुणा, विज्ञानसदृश्यच आहेत. केनोपनिषदात म्हटले आहे की, ज्यांना ब्रह्म कळले असे वाटते त्यांना ते समजलेले नसते; आणि ब्रह्म आपल्याला कळलेले नाही असे ज्यांना वाटते, त्यांना ते कळलेले असते. (“अविज्ञातं विजानातम्। विज्ञातमविजानातम्।। “)

मनोबोधाचे ओवीरूप
काही केला ताडामोडा। विकिला घरींचा पाडारेडा।
काही पैका रोकडा। कळांतरें काढिला।।
ऐसें रुण घेतले। लोकिती दंभ केले।
सकळ म्हणती नांव राखिले। वडिलांचे।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView