Srujan Anand Shibir (सृजन आनंद शिबिर)

'मनशक्ती'च्या बालविकासाच्या प्रारूपावर आधारित १२ गुणांच्या संवर्धनाचे रंजक शिबिर

(१० ते १४ वयोगटातील मुलामुलींसाठी ७ दिवसीय निवासी कला-छंद शिबिर)

आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु.ल.

मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी नव्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी १२ गुणांच्या संवर्धनाचा आराखडा मांडला. ते १२ गुण आहेत: १. परीक्षा यश २. चांगले शरीर ३. क्रीडा कौशल्य ४. कलानैपुण्य ५. देशप्रेम / मानवताप्रेम ६. कृतज्ञताबुध्दी ७. चांगले वागणे ८. दूरदृष्टी ९. व्यवहार १०. शांतीप्रेम ११. निर्भयता १२. नेतृत्व.

'सृजन आनंद' या सुटीतील छंद शिबिरात कोणत्याही अभ्यासाची आवड कशी जोपासावी याचे मार्गदर्शन आहे, पण 'मार्क्स'वादी दृष्टिकोन नाही. त्यामुळे वरीलपैकी पहिला गुण वगळता उर्वरित बहुतेक गुणांचा परिपोष उत्तम होईल. ज्यामुळे केवळ शाळेची नाही तर जीवनाची परीक्षा जिंकायला मुलांना बळ येईल. अभ्यास यशाचा नियोजनबद्ध आराखडा पालकांना पुस्तकरूपात पाहायला मिळेलंच! त्यासाठी लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात स्वतंत्र शिबिरे, चाचण्या-मार्गदर्शन उपलब्ध आहे.

वैशिष्ट्ये

 • निसर्गरम्य परिसरात मुक्त कलेचा, अभिव्यक्तीचा निखळ आनंद
 • उजव्या मेंदूच्या विकासाला पूरक सृजनाचे-निर्मितीचे उपक्रम
 • स्वावलंबन, स्वच्छता, व्यायाम आणि श्रम यातलाही आनंद!
 • खर्या अर्थाने आनंद ’वाटण्या’चा छंद मुलांना लागेल

कला छंद

मनोविकास

 • चित्र, शिल्प, नाट्य
 • कथाकथन, काव्यरचना, गायन
 • ओरिगामी, पाककला, उद्योग
 • किल्ले भ्रमंती, कृषि यापैकी मोजके निवडक
 • 'गीता किशोरांची' - कोर्टाबाहेरील गीता
 • 'माझं तुझं आपलं' - जपूया नातेसंबंध
 • 'माझिया मना' - हितगुज भावनांशी
 • 'सेल्फी-श मुले' - तंत्रज्ञान विवेक

आरोग्य

 • योगासने, सूर्यनमस्कार, खेळ, आहार, प्रार्थना (आत्मसूचना)

बालशिक्षण तज्ज्ञ/सहभागी मार्गदर्शक

 • रमेश पानसे (ग्राममंगल)
 • अनिल अवचट (संस्थापक: मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र)
 • रेणू गावस्कर (एकलव्य न्यास)
 • राजीव तांबे (बाल साहित्यिक)
 • प्रवीण दवणे (साहित्यिक)
 • माधुरी सहस्रबुद्धे (बालरंजन केंद्र)
 • अतुल कहाते (लेखक)
 • आभा भागवत (चित्रकार)
 • श्रीपाद ब्रह्मे, मंगेश कुलकर्णी (पत्रकार)
 • वयोगट: १० ते १४ वयोगटातील मुलामुलींसाठी
  शिबिर स्थळ: मनशक्ती चाकण केंद्र, काळूस रोड, ता. खेड, जि. पुणे.
  व्यवस्था देणगीमूल्य: रू. ४१००/- (मनशक्ती साधकांच्या मुलांसाठी, तसेच चाकण परिसरात राहणाऱ्या व येऊन-जाऊन शिबीर करणाऱ्याना सवलत असेल.)
  चाकण संपर्क: ९०११२५७९७९
  लोणावळा संपर्क:(०२११४) २३४३३०, २३४३३१, २३४३८०
  ईमेल: manashakti.navnond@gmail.com, suhas.gudhate@gmail.com

  इतर माहिती

  पालक सहभाग: शिबिराच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ पर्यंत मनशक्ती चाकण केंद्रात पोचावे. नावनोंद, चहापान झाल्यावर १२ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम पालकांसह होईल. पालकांसाठी 'विवेकी पालकत्वा'ची छोटी कार्यशाळा असेल. शेवटच्या दिवशी पालकांनी समारोपाला आवर्जून यावे. सकाळी १०.३० पर्यंत पोचावे. भोजन करून दु. १ च्या सुमारास परत जाता येईल. (दोन्ही दिवशी २ पालकांची भोजन व्यवस्था होईल.)

  प्रवास सूचना: मुंबईहून एस.टी. बसने चाकणला येता येईल. पुणे स्टेशन आणि शिवाजी नगर येथून एस.टी. (थेट) बस आणि पी.एम.पी.एम.एल. बसने (पुणे ते भोसरी व भोसरी ते चाकण) असे यावे. चाकणला आंबेठाण चौकात उतरावे. एस.टी. स्थानक (२ किमी) अथवा आंबेठाण चौक (१ किमी) येथून चालत / स्वतंत्र रिक्षाने येता येईल. (पहा गुगल मॅप).

  मुलांनी येताना पुढील साहित्य आणावे: दंतमंजन, ब्रश, तेल, कंगवा, साबण, चप्पल, टॉवेल, रुमाल, सर्व प्रकारचे कपडे, आवश्यक औषधे, भ्रमंतीसाठी शक्यतर बूट, सॅक इ. बॅगवर नाव टाकून आणावे.

  पुढील साहित्य आणू नये: मोबाइल, मौल्यवान वस्तू, कॅमेरा, घड्याळ, अंगठी-चेन इ. दागिने, पैसे, खाण्याचे पदार्थ इ. [वही-पेन, कला साहित्य, निवास साहित्य (गादी, बेडशीट, चादर) दिले जाईल.]

  अन्य: स्वावलंबन, नीटनेटकेपणा, शिस्त, नेतृत्व यासाठी स्वच्छता, बागकाम, भोजन वाटप यासारखी कामे मर्यादित प्रमाणात मुलांनी करायची आहेत. निवास व्यवस्था साधी, स्वच्छ असेल. भोजन साधे, रुचकर असेल. अनुभवी साधक आणि ताई-दादा तुमच्या मुलांची तुमच्याइतकीच काळजी घेतील. मुलांच्या प्रकृतीबद्दल काही विशेष सूचना असल्यास आधी जरूर कळवा. अपरिहार्य परिस्थितीत पालकांशिवाय मुले राहू न शकल्यास, आजारी पडल्यास तसे पालकांना कळवले जाईल. आवश्यक वैद्यकीय सेवा ताबडतोब दिली जाईल. विशेष परिस्थितीत (आर्ट थेरपी इ.) मुलांसोबत पालकांना राहायचे असल्यास स्वतंत्र अर्ज करावा.

  चाकण गावातील मुलांना विशेष सवलत

  मनशक्ती: तुमच्या खालोखाल तुमच्या मुलांची काळजी घेणारे केंद्र

&nbsp

Srujan Anand Shibir (सृजन आनंद शिबिर) - 14/04/19 Manashakti Chakan Kendra, Kalus Road, Tal. Khed, Dist. Pune. 14/04/2019 - 19/04/2019 Full Chakan: 9011257979 Lonavla: (02114) 234330, 234380 Add to Cart
Srujan Anand Shibir (सृजन आनंद शिबिर) - 21/04/19 Manashakti Chakan Kendra, Kalus Road, Tal. Khed, Dist. Pune. 21/04/2019 - 26/04/2019 Full Chakan: 9011257979 Lonavla: (02114) 234330, 234380 Add to Cart
Srujan Anand Shibir (सृजन आनंद शिबिर) - 05/05/19 Manashakti Chakan Kendra, Kalus Road, Tal. Khed, Dist. Pune. 05/05/2019 - 10/05/2019 Full Chakan: 9011257979 Lonavla: (02114) 234330, 234380 Add to Cart
Srujan Anand Shibir (सृजन आनंद शिबिर) - 12/05/19 Manashakti Chakan Kendra, Kalus Road, Tal. Khed, Dist. Pune. 12/05/2019 - 17/05/2019 Full Chakan: 9011257979 Lonavla: (02114) 234330, 234380 Add to Cart
Srujan Anand Shibir (सृजन आनंद शिबिर) - 19/05/19 Manashakti Chakan Kendra, Kalus Road, Tal. Khed, Dist. Pune. 19/05/2019 - 24/05/2019 Full Chakan: 9011257979 Lonavla: (02114) 234330, 234380 Add to Cart

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView