उपकारांची शर्यत

Date: 
Sun, 17 Nov 2013
जेरूसलेम हे शहर जेथे वसले गेले, तेथे ते वसण्यापूर्वी त्या परिसरात दोन भाऊ राहात होते. एक भाऊ लग्न झालेला होता. मुलेबाळे असणारा होता. आणि दुसऱ्याचे लग्न झालेले नव्हते. एका वर्षी पीक कमी आले. धान्याचे ढीग घराबाहेर दोघांनी घातले. ते छोटे ढीग दोघांनाही बोचले. रात्री ब्रह्मचारी भाऊ उठला आणि मनाशी म्हणाला, “माझ्या भावाचे कुटुंब मोठे आहे. त्याला जास्त धान्य हवे. “असे म्हणून त्याने दहा मापे धान्य भावाच्या ढिगात टाकले. थोड्या वेळाने मोठा भाऊ उठला. मनाशी म्हणाला, “माझा भाऊ एकटाच आहे. त्याला शेतावर मदत करायला कोणीही नाही. तेव्हा मी मदत करावयास हवी. “असे म्हणून त्याने दहा मापे धान्य आपल्या भावाच्या ढिगात घातले. सकाळी दोघे भाऊ उीून पहातात तर दोघांचे ढीग सारखेच. ते पाहून दोघेही चकीत झाले.