एरंंडेलाची आठवण!

Date: 
Sun, 1 Jun 2014

एरंंडेलाची आठवण!
खरें शोधितां शोधिता शोधताहे।
मना बोधितां बोधितां बोधताहे।
परी सर्व ही सज्जनाचेनि योगें।
बरा निश्र्चयो पाविजे सानुरागे।।151।।

दीडशेव्या श्र्लोकापर्यंत ब्रह्माबद्दलची माहिती देऊन झाली, तेव्हा श्रीरामदास आता मनाकडे वळत आहेत. ‘खरे आपण शोधत जात असताना त्याचा शोध लागतो. ‘असे आश्र्वासन देऊन श्रीरामदास दुसऱ्या ओळीत म्हणतात, ‘या शोधामुळे मनाला वळण लावता लावता त्यास ज्ञानरूप करण्याची क्रिया समांतर चालते. ‘याचा अर्थ असा की मनाचे शहाणपण आणि ज्ञानाचा शोध या गोष्टी एका पातळीवर समरूपच आहेत.
तिसरी ओळ मनाला बोध करण्याची युक्ती सांगते. ती सज्जन संगतीची. आज नुसताच वरवर विचार केला तर असे वाटते की, नुसत्या सज्जनाच्या संगतीत काय होणार? तर मनाची अशी गंमत आहे की, ज्याचा विचार करते त्या दिशेने ते झुकते. क्षणभर तुम्ही नुसता विचार करा की, रस्त्यावर पडलेले शेण तुम्ही खाल्ले आहे किंवा एरंडेल प्याला आहात. म्हणजे प्रत्यक्ष एरंडेल न पीताही तुमचे तोंड एरंडेल प्याल्याच्या आठवणीने घाण होईल. उलट हापूस आंब्याच्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटेल. चांगल्या आणि वाईटाच्या आठवणीनेच शरीरात चांगला किंवा वाईट फरक पडतो, ह्याचे हे सोप्यातले सोपे उदाहरण आहे. म्हणून आपल्याला चांगले मिळावे असे वाटत असेल तर सज्जनाची म्हणजे चांगल्या माणसाची संगगती आपल्याला उपयोगी पडणार.

सज्जन संगतीत जाण्यासाठी निश्र्वयाबद्दल अनुराग म्हणजे प्रेम निर्माण व्हावे, असे चौथी ओळ सुचविते. म्हणजे ब्रह्माचा शोध घेण्यासाठी स्पष्ट पायऱ्या आपल्यापुढे आल्या. मनाला बोध, त्यासाठी सज्जनाची संगत, त्यामुळे मनाचा अन्तिम निश्र्चय आणि तेथून पुढे ब्रह्माचा साक्षात्कार, की जो पुढल्या श्र्लोकाचा विषय आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
दिवसेंदिवस खर्च वाढला। यावा होता तो खुंटोन गेला।
कन्या उपवरी ज्याला त्यांला। उजवावया द्रव्य नाही।
मायबापें होतीं संपन्न। त्यंाचे उदंड होते धन।
तेणें करितां प्रतिष्ठमान । जनी जाला होता।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView