कमावलेले बक्षिस

Date: 
Sun, 29 Dec 2013

औच येथील धर्मगुरूची ही हकीगत आहे. औचमध्ये एक दिवस मोठी आग लागली. एक अगदी छोटा मुलगा आगीत सापडला होता. आग इतकी धडाडून पेटली होती की त्याला वाचवायला कोणी पुढे होईना. धर्मगुरूने जमावाला सांगितले की, जो कोणी मुलाला वाचवील त्याला शंभर नाणी मिळतील. कोणी पुढे होईना. धर्मगुरूने ते बक्षिस
दुप्पट केले; पण एवढ्या आगीत कोण जाणार? मुलाची आई किंकाळ्या फोडीतच होती. पुन्हा एकदा धर्मगुरूने चौपट बक्षिस केले. पाचपट बक्षिस केल्यावरही कोणी पुढे होईना. धर्मगुरूला किंकाळ्या ऐकवेनात. ते तसेच पुढे घुसले व त्यांनी मुलाला वाचवले. ते परतले तेव्हा सर्व घर आगीच्या डोंबात पडले. सर्व लोकांनी धर्मगुरूंची प्रशंसा केली. धर्मगुरू म्हणाले, “आज मी स्वत:च खरे खुरे बक्षिस मिळवले. दोन हजार नाणी मिळवली

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView