घातकी विंचू

Date: 
Sun, 10 Aug 2014

अहंतागुणें सर्व ही दु:ख होते।
मुखें बोलले ज्ञान तें वेर्थ जातें।
सुखी राहतां सर्व ही सूख आहे।
अहंता तुझी तूं चि शोधूनि पाहे।।161।।

एक विंचू डौलाने डोलत चाललेला असतो. समोर येणाऱ्या प्राण्याला एका फटकाऱ्याने लोळवतो. माणसासारखा महाकाय प्राणी विंचवाच्या नंागीच्या स्पर्शामुळे दु:खाने तळमळतो.

पण भस्मासुराप्रमाणे विंचवाचाही घात होऊ शकतो.
असे म्हणतात की, विंचू स्वत:च्या फटकाऱ्याने मरू शकतो. ही आख्यायिका खरी का खोटी, विंचवालाच माहीत. मांजरी जन्मल्याबरोबर स्वत:च्या पोरांना खाऊन टाकते, ही आख्यायिका खरी का खोटी, तिलाच माहीत. पण माणूस स्वत:च्या अहंकाराने मरू शकतो, हा अनुभव नेहमीचा आहे. ज्ञान हे दाखविल्याशिवाय चैन पडत नाही, अशी माणसाची स्थिती होते, तेव्हा ते ज्ञानच नसते, निदान ते पूर्ण ज्ञान तरी नसते.
एका स्त्रीला सोन्याच्या दागिन्यांची फार हौस होती. तिने डोंगरावर तप केले आणि स्वत:च्या वजनाच्या भारंभार दागिने मागून घेतले. परमेश्र्वराने वर दिला आणि तिला भारंभार सोन अंगावर आले. पण स्वत:च्या वजनाएवढे सोने अंगावर असल्याने ती एक पाऊलही पुढे टाकू शकली नाही.

तिला त्या डोंगरावरच बसून रहावे लागले आणि बिचारी ती तेथेच अन्न पाण्यावाचून मरून गेली. तिला सोन्यानेच खाऊन टाकले. वास्तविक सोने तिला स्वत:साठी हवे होते.
ज्ञान हे स्वत:साठी वापरले ते शुध्द असते. दाखविण्यासाठी वापरले तर त्याने असुख निर्माण होते. ज्ञान हे दुसऱ्याला देण्याला हरकत नाही. तर दाखवण्याला हरकत आहे. ज्ञान जेव्हा देण्याच्या इच्छेने दिले जाते, तेव्हा त्यात अहंकार नसतो. पण आपल्याला ज्ञानी म्हणाव, म्हणून ते ज्ञान, डामडौलाच्या इच्छेन अहंकार निर्माण करणारे ठरते; आणि ज्ञान हरपते. त्यासाठी श्रीरामदास येथे अहंता शोधण्याचा उपदेश करीत आहेत.

ज्ञानेश्र्वरी मानस
(‘चिंतामुक्ती मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9, श्र्लोक 8 ची मंत्रंसलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
तरी हेचि प्रकृति किरीटी। मी स्वकीय सहजे अधिष्टीं।
तेथ तंतुसमवाय पटी। जेविं विणावणी दिसे।।106।।
अर्थ: तंतूंचा समूह जसा आडवा उभा गुंफून स्वत:च पटरूप धारण करतो, त्याप्रमाणे मी या आपल्या मायेला सहज लीलेने धारण करतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView