चार मन प्रकारचे तीन तेरा

Date: 
Sun, 16 Mar 2014

जयाचें तया चूकलें प्राप्त नाही।
गुणें गोविलें जाहलें दु:ख देहीं।
गुणावेगळी वृत्ति ते ही वळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना।।140।।

चार मन प्रकारचे तीन तेरा
जयाचें तया चूकलें प्राप्त नाही।
गुणें गोविलें जाहलें दु:ख देहीं।
गुणावेगळी वृत्ति ते ही वळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना।।140।।

एकशेएकोणतिसाव्या श्र्लोकापासून मनाचे हे चार प्रकार आपण डोळ्याखालून घालीत आहोत. त्याची चिरफाड हा श्र्लोक करीत आहे. मनाबद्दलचे चार प्रकारचे विश्र्लेषण जुन्यांनी केले आहे. पण ते ते आपण अहंकाराने वापरण्याचे टाळीत आहोत. मनाच्या चार प्रकारांपैकी म्हणजे भय, राग, धैर्य, शांत या प्रवृत्तीपैकी पहिल्या दोन माणसाने टाळावयाच्या आहेत. तिसरा जो गुण आहे, तो धरावयाचा आहे. आणि या गुणाच्या पसाऱ्यातसुध्दा पडावयाचे नसेल तर मनाची शांत प्रवृत्ती धरावयाची. असे चार उपाय माणसापुढे विचारवंतांनी ठेवले ही स्थिती या श्र्लोकात वर्णन केली आहे.

पहिली ओळ सांगते की, भय आणि राग या ज्या तुमच्या चुका आहेत, याबद्दलचे ज्ञान काही ज्याचे त्याला प्राप्त होत नाही. आता दुसरी ओळ सांगते, गुणाच्या साम्राज्यात गोवलेली जी गोष्ट म्हणजे अर्थात् त्यातल्या त्यात धैर्य, ही आयुष्यात बाळगायची तर त्याचेही देहाला दु:ख होते. मनाच्या तीन प्रवृत्तींचा, याप्रमाणे, दोन ओळीत निकाल लावल्यावर तिसऱ्या ओळीत श्रीरामदास सांगतात की ठीक आहे. तमोगुण, रजोगुण, सत्त्वगुण यापैकी बरेवाईट घेण्याटाकण्याची काहीच मेहनत तुम्हाला नको असेल तर गुणाचा सगळाच मोह बाजूला टाळून, खुशाल गुणातीत व्हा. पण तिसऱ्या आणि चौथ्या ओळीचा संतुलित निष्कर्ष काढून श्रीरामदास सांगतात की, गुणाचे दोष समजतात, पण ते टाकवत नाहीत.

मनोबोधाचे ओवीरूप
तेणे बहुत दु:ख जालें। घरी आरंधें पडिलें।
म्हणती आम्हांस कां ठेविलें। देवें वांज करूनि।
आम्हांस द्रव्य कायें करावें। तें जावें परी अपत्य व्हावें।
अपत्यालागी त्यजावें। लागेल सर्व।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView