जगाचा जन्म कोठून?

Date: 
Sun, 22 Feb 2015

मही निर्मिली देव तो ओळखावा।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा।
तया निर्गणालागि गूणी पहावे।
परी संग सोडूनि सूखें रहावें।।189।।

एखादी सुंदर वस्तू पाहिली की करणाऱ्याची ओळख करून घ्यावीशी वाटते. आपल्या प्रंाताचा अधिकारी असेल, त्याची ओळख करून घ्यावीशी वाटते. पण देवाची ओळख?
देवाची ओळख करून घ्यावीशी वाटणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे जग ज्याने निर्माण केले त्याची ओळख करून घेण्यासाठी आपण कितीशी धडपड करतो? ही प्रचंड पृथ्वी, हजारो ग्रहतारे, अफाट विस्तार कोणी निर्माण केला असेल? त्याबद्दल उत्सुकता बाळगावी. देवाचा शोध घ्यावा व योग्य मार्गाने गेले, म्हणजे तो देव भेटेल, आणि देव असा भेटेल की ज्यामुळे आपण सगळ्या व्याधी-उपाधीतून मुक्त होऊ, असे दुसरी ओळ सांगते.

तिसरी ओळ जोड जोडते की, देव हा मुळात निर्गण आहे हे खरे; पण आपण निर्गुण निराकार अशा स्थितीत जीवनच काय पण चिंतनसुध्दा अधिक वेळ करू शकत नाही. या आपद्धर्मामुळे, म्हणजे आपल्याच मर्यादेमुळे आपण ज्या सृष्टीत रममाण होतो त्या साकार सृष्टीत देवाची कल्पना गुंफीत जावे. आपल्या सोईसाठी आणि मर्यादित प्रमाणात, निर्गुणाचे रुपांतर सगुणात करावे. मात्र तेथेच चौथी ओळ चपखल बसते आणि म्हणते, की असे असले तरी सगळ्याचा बाह्य संग सोडून आत सुखी राहण्याची प्रक्रिया चालू ठेवावी.

पहिल्या ओळीच्या निमित्ताने असा प्रश्र्न येईल की, ही सृष्टी कशी निर्माण झाली? याच्याबद्दल विज्ञानाचे उत्तर काय आहे? विज्ञानाचे एक उत्तर म्हणजे, ‘अजून शोध लागला नाही’ असे नाही. पण आणखी एक शक्यता आहे. ‘सायन्स अँड फिलॉसॉफी’ या ग्रंथातील परिशिष्टात मुद्दा ‘अठरा ए’ मध्ये प्रो.हायमन लेव्ही म्हणतात की, एखाद्या क्षुद्र ऍटमपेक्षाही एखादा क्वांटम (की ज्याची वेव्हलेंग्थ लहानात लहान आहे) त्यापासून हे सर्व विश्र्व विस्तारले आहे. विश्र्वाच्या उत्पत्तीबद्दल; काही जणांची समजूत ही अशी आहे. त्याची दुसरी बाजू पुढील श्र्लोकात.

मनोबोधाचे ओवीरूप
येकांच्या बैसल्या अमृतकळा। येकांस चंद्री लागली डोळां।
येकें कांपती चळचळां। दैन्यवाणी।।
येकें दीनरूप बैसली। येकें सुजली येकें मेली।
ऐसी कन्यापुत्रें देखिली। अकस्मात डोळां।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView