जुन्या वैज्ञानिक पुराव्याचे श्रेष्ठत्व

Date: 
Sun, 2 Mar 2014

जुन्या वैज्ञानिक पुराव्याचे श्रेष्ठत्व

भ्रमे नाडळे वीत ते गुप्त झाले।
जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आले।
देहबुध्दीचा नि:श्र्चयो ज्या टळेना।
जुने ठेवणें मीपणे आकळेना।।138।।

एकशेसदतीसपासून पाच श्र्लोक चौथ्या ओळीत जुन्या पुराव्यांची श्रेष्ठता सांगत आहेत. गेल्या सात आठ श्र्लोकांच्या संदर्भात, साहजिकच याबद्दल मानसशास्त्राच्या दृष्टीने पुरावे अभिप्रेत आहेत. वास्तविक मनाचे श्र्लोक मानसशास्त्राच्या संदर्भातच असल्याने त्या संदर्भात अभ्यास आणि पुरावे सांगितले पाहिजेत.

भय, राग धैर्य, शंात या मानसतऱ्हा श्रीरामदासांनी विचारात घेतल्या, त्यांना जुन्या विज्ञानाचा आधार आहे, हे एकूण श्र्लोकांची चौथी ओळ सांगते. हिपोक्रेटस हा औषधशास्त्राचा पिता आणि पॉवलॉव्ह हा नोबेल पारितोषिक विजेता, मानसशास्त्रज्ञ. ह्या दोन्ही टोकांच्या शास्त्रज्ञांनी, मनुष्य स्वभावाच्या तऱ्हांचे चार वर्ग केले आहेत. आणि ते वर्ग श्रीरामदासांच्या वर्गीकरणाप्रमाणेच आहेत. ‘सायकॉलॉजी ऍज यू मे लाइक इट’ या ग्रंथाच्या पान दोनशे त्रेसष्टवर याचा स्पष्ट तुलनात्मक तक्ताच आहे.
वैद्यकीय भाषेत बोलावयाचे झाले तर कफ, पित्त, वात व या तिघांची साम्यावस्था, असे चार प्रकार सांगता येतील. कारण त्रिदोषाचे सामर्थ्य म्हणजेच शांती आणि आरोग्य असे हा श्र्लोक पर्यायाने सांगतो. पौर्वात्य तत्वज्ञानाच्या भाषेत, हीच गोष्ट आपल्याला तम, रज, सत्व आणि गुणातीतता या चार पातळ्यांवर सांगता येईल. तेव्हा हजारो वर्षांपासून जुन्यांनी सिध्द केलेले हे ज्ञान जे मानणार नाहीत, ज्यांना ते ज्ञान आठवणार नाही, त्यांना भ्रम झाला आहे असे श्रीरामदास पहिल्या ओळीत सांगत आहेत. ते जन्मदरिद्री आहेत, अनिश्र्चयी आहेत, म्हणून असे होते, असा निष्कर्ष काढीत आहेत.

मनोबोधाचे ओवीरूप
म्हणोन नाना सायास। बहुत देवांस केलें नवस।
तीर्थे व्रते उपवास। धरणें पारणें मांडिले।
विषयसुख तें राहिलें। वांजपणें दु:खी केलें।
तव तें कुळदैवत पावलें। जाली वृध्दी।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView