दारू सोडण्याची युक्ती

Date: 
Sun, 14 Aug 2011

दारू सोडण्याची युक्ती
मना पापसंकल्प सोडुनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा।।
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकार घडो हो जनीं सर्व ची ची ।।5।।

रामदासांनी पाचव्या श्लोकात प्रथमच पाप सोडून द्यायला संागितले आहे. पापच नव्हे, तर पापाचा संकल्पसुध्दा. आता नुसते पाप नको म्हणून भागत नाही, ती एक नकारी कल्पना झाली. पाप न करणारा मनुष्य पुष्कळ वेळा भीतीने पाप करत नाही. पाप करण्यालासुध्दा धाडस लागते आणि ते नसल्यामुळे कित्येक माणसे पाप करीत नाहीत. ऊर लोंबत असलेला शेंदरी कलमी आंबा घ्यावासा वाटतो. जिभेला पाणी सुटते. पण झाडावरही चढता येत नाही आणि नेमही लागत नाही. मग ढोंगी माणूस स्वत: म्हणतो, अरे, दुसऱ्याच्या बागेतला आंबा चोरू नये. आता या ढोंगी माणसाला पाप सोडल्याचे श्रेय मिळेल का? मुळीच मिळणार नाही. कारण त्याने मनाने आंबा खाल्ला आहे. शरीराच्या कब्जात तो आंबा आला नाही हा त्याचा चांगुलपणा नसून नाईलाज होता.

मनाचे अभंगरूप करीं हे चि काम। मना जपें राम राम।।1।।
लागो हा चि छंद। मना गोविंद गोविंद।।2।।
तुका म्हणे मना। मज भीक द्यायी दीना।।3।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView