देव सेवक बनतात तेव्हा

Date: 
Sun, 12 Feb 2012

देव सेवक बनतात तेव्हा...
महा संकटी सोडिले देव जेणें।
प्रतापें बळें आगळा सर्व गूणें।।
जयातें स्मरे शैल्यजा शूळपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।31।।
श्रीरामाच्या प्रतापाने सामान्य माणसाला धीर येण्यासाठी काही मानसशास्त्रीय आवश्यता असातात. सामान्या माणसाला देवसामर्थ्याची सुध्दा प्रचीति हवी असते. ती प्रचीति या श्लोकात मिळते. श्रीरामाने देवावरचे संकटसुध्दा दूर केल, असा उल्लेख श्लोकाच्या पहिल्या ओळीत आहे. श्रीरामदासांनी एका कवितेत देवावर कसा कठीण प्रसंग आला होता, याचे वर्णन केले आहे. त्यात ते म्हणतात, “समीर लोटितो खडे। वरून घालितो सडे। मयंक साऊली धरी। मळीण पावकु हरी। विधी विधीस धाकतो। सुरेंद्र बाग राखतो।। करावयास निग्रहो। भूमंडळाशी निग्रहो।। अखंड चाकरी करी। सदा वरूची भादरी। सटी आरंधळी दळी। गणेश गाढवे वळी।।” श्रीगणेशाची गाढवे वळण्यापर्यंत पाळी आली होती. मग इतरांची काय कथा? याच स्थितीतून रामाने देवांची सुटका केली.
अशा उदाहरणाने काय होते? याने सामान्य माणसाची पातळी दोन तऱ्हेने उंचावते. एक असे की, सामान्य मनुष्य म्हणतो, देवाचे संकटसुध्दा दूर करणारा समर्थ, परमसमर्थ राम माझे संकट नक्कीच दूर करील. पण ही झाली फळाची भाषा. ती सोडली तरी यातील दुसरी मानसशास्त्रीय महत्त्वाची पातळी अशी की, संकटापुरतेच नव्हे तर, इतर वेळीही देव रामस्मरण करीत असतात. येथे सामान्य माणूस म्हणणार की, मला संकट असो वा नसो, देवसुध्दा ज्याचे स्मरण स्वत: करतात, त्याचे स्मरण संकट नसले तरी मला करणे योग्य असलेच पाहिजे.
पुन्हा कोणी विचारेल की, संकट नसेल, त्या अवस्थेतसुध्दा देव रामाचे स्मरण करतात का? यावर तिसरी ओळ आठवण करून देते की, शैलजा म्हणजे साक्षात् पार्वती रामस्मरण करते. त्यापाठोपाठ शूळपाणी म्हणजे शंकर हेही रामस्मरण करतात.
मनाचे ‘अभंग’रूप
जळा ते जाणीव जळो ते शाहाणींव। राहो माझा भाव विठ्ठलपायी।।1।।धृ।।
जळो ते आचार जळो तो विचार। राहो मन स्थिर विठ्ठलपायी।।2।।
जळो हा लौकिक जळो दंभमान। लागो जीवा ध्यान विठ्ठलाचे ।।3।।
जळो हे शरीर जळो हा संबंध। राहो परमानंद माझ्या कंठी।।4।।
तुका म्हरे येथें अवघें चि होय। धरीं मना सोय विठोबाची।।5।।
-तुकाराम

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView