धैर्य धरण्याची युक्ती

Date: 
Sun, 28 Aug 2011

धैर्य धरण्याची युक्ती
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोसीत जावें।।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें।।7।।

माणसाचा घात भित्रेपणाने जेवढा केला असेल तेवढा दुसऱ्या कशानेही केला नसेल. माणूस जर खरे बोलायला भिणार नाही, असुखाला भिणार नाही. भुकेलासुध्दा भ्यायचे नाही का? हा प्रश्र्न चटकन सोडवता नाही आला, तरी त्यातले भिणे संपवले पाहिजे. भुकेचे दु:ख जावे म्हणून प्रयत्न करावा. पण त्यातून भीती उणी करावी. भीती आणि प्रयत्न यात पुष्कळ फरक आहे. प्रयत्न चालू ठेवाव आणि भिणे संपवत आणावे. श्री रामदासांना सातव्या श्लोकात याच जातीने श्रेष्ठ धारीष्ट्य हवे आहे.
या खालोखाल त्याच जातीची त्यांची सूचना निंदा सोसण्याची आहे. धारीष्ट्य उंच असावे, ते किती उंच? तर नीचातल्या नीच माणसाने बोललेले अपशब्दसुध्दा, त्या उंचीवर घायाळ करू शकणे अशक्य व्हावे. निंदा सोसणे, हेच मुळी एक उच्च प्रकारचे धैर्य आहे आणि या अर्थाने पहिली ओळ आणि दुसरी ओळ एकाच मतलबाची म्हणता येईल. वास्तविक व्यवहारात होते असे की, लोकांचे खरे बोलणेचे आपल्याला निंदेसारखे वाटत असते. आपण चुकलो माणसाला कधी सहन होत नाही आणि मग तो दुसऱ्याने सांगितलेल्या सत्यालाच ’निंदा’ म्हणू लागतो. यावर स्वामी रामदासांनी मेख मारून ठेवली की, मुळात तू खोटी निंदासुध्दा सहन करायला शीक. निंदेलासुध्दा तुझे उत्तर नम्र असावे, त्याने लोक संतुष्ट होतील. आत्मविचार प्रवृत्त होतील आणि केव्हातरी त्यांचेही कल्याण होईल. कानावर पडेल ती निंदा असह्य मानली आणि हात उगारला, तर व्यवहारात कधी शेराला सव्वाशेर भेटतात. पूर्वी उचलेला हातही कापला जातो.

‘ ’
मनाचे ’ अभंग’ रूप
मन गुंतलें लुलयां। जाय धांवोनि त्या ठाया ।।1।। धृ।।
मागें परतावी तो बळी। शूर एक भूमंडळी ।।2।।
येऊनियां घाली घाला। नेणों काय होईल तुला।।3।।
तुका म्हणे येणें। बहु नाडिलें शाहाणे।।4।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView