बदलाचे स्थळ (जंक्शन)

Date: 
Sun, 2 Nov 2014

स्वरुपी उदेला अहंकार राहो।
तेणें सर्व आच्छादिले व्योम पाहो।
दिशा पाहतां ते निशा वाढताहे।
विवेकें विचारें विवेचूनि पाहे।।173।।

मागल्या श्र्लोकात वर्णन केले आहे की, मनातील एकाच ठिकाणाहून दोन परस्पर विरोधी फाटे फुटतात. एका फाट्यात विवेक आणि दुसऱ्या फाट्यात अहंकार भरलेला आहे.

या श्र्लोकात पहिल्या दोन ओळीमध्ये यांचा संबध उपमेने सांगितला आहे. ‘व्योम’ म्हणजे आकाश. माणसाच्या अंतरंगातील आकाशात  

अहंकाररूपी राहूचा (राहो म्हणजे राहू) उदय होतो. त्यामुळे सगळ्या दिशेने अंधार पसरल्यासारखा वाटतो, असे तिसरी ओळ सांगते, आणि चौथी ओळ सांगते की, याचा विचार विवेकानेच केला पाहिजे. आणि मनाला फुटलेला फाटा मोडून काढला पाहिजे.
देह आणि मन यांचा संबंध सांगणारा हा दहावा श्र्लोक एखाद्या बदल स्थानासारखा (जंक्शनसारखा) आहे. मनाच्या श्र्लोकाच्या एकशे सत्तावीसपर्यंतचा पूर्वार्ध भक्तीप्रधान आहे. नंतर एकशे सेहेचाळीपर्यंतचे श्र्लोक मनज्ञान, मानसशास्त्राच्या दृष्टीने सजतात. एकशे सेहेचाळी श्र्लोकानंतर अगदी अखेरपर्यंत निरनिराळ्या विषयांचे सांधे कसे जोडले आहेत, हे येथे पहाणे आवश्यक आहे.

ब्रह्मविज्ञान -146-150
मनब्रह्मसंबंध-151-159
मनोपदेश-160-62
देहरूप-154-179
गुरू(खरे-खोटे)-180-183
सत्-राम-ब्रह्म-184-186
साधना उपाय-187-190
साधनेत अडथळे कोणते-191-192
देव राम सर्वत्रात-193-200
सारांश, उपदेश, आश्र्वासन200ते205
एकशे त्र्याहतत्तरावा श्र्लोक हा दोन अर्थांनी बदलस्थान (जंक्शन) आहे. हे सुरुवातीच्या आणि नंतरच्या विवचेनावरून दिसून येईल.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView