भय ते शांती विवेचन पुरावा

Date: 
Sun, 16 Feb 2014

भय ते शांती विवेचन पुरावा

भयापासून शांतीपर्यंत माणसाच्या चार अवस्थांची चर्चा श्रीरामदास एकशेएकोणतिसाव्या श्र्लोकापासून करीत आहेत. त्यांच्या विज्ञाननिष्ठ समारोपाचे श्र्लोक एकशेपस्तीस व एकशेछत्तीस आहेत. याबद्दलचे काही पुरावे आपण गेल्या श्र्लोकात पहिले. याहीपेक्षा अधिक ठसठशीत पुराव्यांचे दुसरे पाऊल या श्र्लोकात पडले आहे.

श्रीरामदास खणखणीत आवाजात सांगत आहेत की, हे सगळे जग कशाने भरलेले आहे तर भयाने. एकशे एकतिसाव्या श्र्लोकाचे विवेचन करताना भयाच्या मूल स्वरुपाबद्दल आपण सविस्तर वर्णन केले आहे, पण नुसता भयाचाच उल्लेख असता, तर आपण ज्याला समारोप म्हणतो त्याच्या पुराव्याचा धागा आपणास मिळाला असता. तो मिळावा म्हणून श्रीरामदास भय ते शांती या टोकांचा उल्लेख या श्र्लोकात अगदी स्पष्टपणे करीत आहेत. ते म्हणतात, या जगाला भारून टाकणारी भय ही प्रेरणा आहे. त्यापासून निर्माण होणारे दोष संपविण्याची रेषा भयातीतेत, संतपणात, सत् अवस्थेत; शांततेत, शांती साधनेत तुम्हाला पहावयास सापडेल.
एकदा तुम्ही शांत विज्ञानापर्यंत शंातीच्या विचारापर्यंत येऊन पोचलात म्हणजे तुमच्या हृदयात निराळीच सृष्टी उमलेला. तुम्ही शांतीच्या अवस्थेत पोचलात म्हणजे भिणारा मनुष्य व असा भिणारा मनुष्य ज्याला भितो यात वस्तुत: अंतरच उरले नाही, हे लक्षात येते. मी चारी केली, म्हणून समोर अधिकारी दिसला म्हणजे मला भीती वाटते. पण चारी केली नसली तर अधिकाऱ्याचे भय वाटण्याचे कारण उरत नाही. तेव्हा माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेली भीती, त्या अधिकाऱ्यापासून निर्माण झालेली नसून वस्तुत: ते भय माझ्यापासूनच निर्माण झालेले आहे, हे ज्ञान एकाद प्राप्त झाले की दुसऱ्या कोणाला भ्यायचे सोडून दिले, म्हणजे मला भ्यावे लागेल. म्हणजे द्वैत संपले. ज्ञानाच्या शांतीची ही सुरुवात आहे. असे या श्र्लोकाच्या पुढल्या ओळी सांगतात. ते होत नाही म्हणून भय, राग, धैर्य, शांती या चार अवस्थांचा अभ्यास मानसशास्त्रज्ञ करतात. त्याचा पुरावा पुढल्या श्र्लोकात.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView