मनाच्या सुखाचे महाद्वार

Date: 
Sun, 17 Jul 2011

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ।।१।।
‘ Never mind, if mind is not matter’ आणि ‘Does not matter, if mind is matter’ अशा उलटसुलट कोट्या इंग्रजीमध्ये मनावर केलेल्या आहेत.
मनाचा मूलभत विचार भारतीय संस्कृतीने वेदापासून केला आहे.
मनाचे श्लोक हे मनाबद्दल सूक्ष्म विचार करणारे एक अभिमानाचे स्थळ आहे. सूक्ष्म आणि भव्य. इंद्रियाचा मनावर परिणाम सांगणारे आणि मनाचा इंद्रियांवर परिणाम सांगणारे.
भव्यता अशी की, मनाचे श्लोक दोनशे पाच आहेत. पण सूक्ष्मता अशी की, मनाचे सूक्ष्म रूप पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे. ओमकाराने उपनिषद सुरू झाले, असे म्हणतात. जाणत्याच्या लेखी ते तेथे संपलेही आहे. विनोबाजी ‘स्थितप्रज्ञ दर्शन’, पान पाचवर म्हणतात, ‘पातंजलाच्या एकशेपंच्याण्णव सूत्रांपैकी पहिल्या तीन सूत्रांतच सर्व शास्त्र सांगून संपले आहे.’ त्याच सूक्ष्मतेने मनाचे श्लोक पहिल्या श्लोकात संपले. त्यात त्यांनी काय सांगितले ते पहा. गुण हे निर्गुण झाले. मन हे आत्मरुप शुद्ध झाले. म्हणजे आरंभाचा शेवट झाला. ज्ञानाची, शारदेची उपासना हेच सांगेल. राममार्ग हीच गोष्ट सिद्ध करील.
मनाच्या श्लोकाचा विस्ताराने अभ्यास ही एक आनंददायक आणि संस्कारमय गोष्ट आहे. त्याच्या पहिल्या श्लोकाचा हा साक्षात्कार सूक्ष्म आणि गोड आहे. मनाचे विकल्प बाजूला ठेऊन आनंद मिळवा. म्हणजे शांती मिळेल आणि रामदर्शनाचा दरवाजा उघडेल. रामदर्शनाचा दरवाजा उघडेल.
राम हरिचे रहस्यसुद्धा पाहण्याजोगे आहे. ते पुढल्या श्लोकात आहे.
.................

मानस ज्ञानेश्वर

(संसारसौख्य मंत्र, या साधनेसाठी अध्याय ७ श्लोक २० ची मंत्र संलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
आणि फळाचिया हावा । हृदयी कामा आला रिगावा।
की तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ।।१३९।।
अर्थ- फळाच्या हावरेपणाने अंतःकरणात स्पर्श केला की ज्ञानाचा दिवा झपाट्याने मालवला जातो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView