मरणाचा देव कोण?

Date: 
Sun, 24 Feb 2013

भजा राम विश्राम योगेश्र्वरांचा।
जपू नेमिला नेम गौरीहराचा।
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।
तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी।।85।।

गेल्या श्लोकात श्रीशंकराला रामानामाने शंात केल्याचा उल्लेख तिसऱ्या ओळीत आहे. पण त्याचा श्लोकात चौथ्या ओळीतला “अंतकाळी राम सोडवतो” हा उल्लेख शंकराला उद्देशून नाही, असेही आपण तेथे म्हटले होते. त्याचा अन्वयार्थ नेमका या श्लोकात लागतो आहे. मागल्या श्लोकातील शेवटच्या ओळी जवळ जवळ सारख्या आहेत. चौथ्या ओळीत फक्त एका शब्दाचा उल्लेख आहे, तेथे पहिला शब्द “जिवा” हा आहे व येथे पहिला शब्द “तुम्हा” हा आहे.
याचा अर्थ असा की, रामानामामुळे शंकर शांत झाले, हा उल्लेख स्वतंत्र आहे. पण अंतकाळी रामाने शिवाला सोडवले, असे रामदासांना म्हणावयाचे नसून येथे ‘तुम्हा’हा शब्द आहे. तो शब्द स्पष्ट आहे. तो शब्द स्पष्ट सांगतो की, सामान्या भक्ताला, सामान्य माणसाला, ‘तुम्हाला’अंतकाळी राम सोडवील.
एक तर ब्याऐंशिव्या श्लोकांत उल्लेख केलेले शंकराचे विषप्राशन हे काही स्वार्थासाठी नसून लोकहितार्थ होते. तेव्हा तो त्रास महातापसी शंकराने रामानामाने मिटवला, येथवर ठीक झाले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, विषाने असो की अन्य कारणाने असो, शंकराला दु:ख येईल; पण त्याचा अंतकाळ कोठून असेल? मृत्यूचा देव हाच मुळी शंकर आहे, तर त्याला मृत्यू कुठला? पण त्या देवदेवेश्वरालाही दु:खाच्या क्षणात रामाचे शांतिसामर्थ्य मिळू शकते हे महत्त्वाचे आणि याचे कारण, पहिल्या ओळीत म्हटल्याप्रमाणे, राम हा योगेश्र्वर आहे.

ज्ञानेश्वरी मानस
(‘उद्योगसिध्दिमंत्र’ या साधनेसाठी अध्याय 8 श्लोक 18ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
पुढती दिहाची चौपाहारी फिटे। आणि हा आकारसमुद्र आटे।
पाठी तैसाची मग पाहाटे। भरो लागे।।161।।
अर्थ: ब्रह्मभुवनातील दिवसाचे चार प्रहर पुरे झाले, म्हणजे या नामरूपात्मक साकार विश्वाचा पसारा एकदम ओसरतो. आणि पुन्हा जेव्हा तेथे दिवस उजाडतो, तेव्हा हा पसारा पुन्हा मंाडू लागतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView