राजपुत्राचे घड्याळ

Date: 
Sun, 9 Feb 2014
1866साली प्रशिय व ऑस्ट्रिया यात युध्द झाले. या युध्दामध्ये प्रिन्स ऍन्टले हा जखमी झाला. त्याला यातना सहन होईनात. रणांगणावर कोण कोणाला ओळखतो? प्रिन्स त्या भयंकर जखमी स्थितीत म्हणू लागला, “मला कोणीतरी मारून टकाा, म्हणजे मी यातनेतून सुटेन. एका शिपायाला त्याची दया आली आणि त्याला पाठीवर घेऊन, त्याने इस्पितळावर पोचवले. प्रिन्स बरा झाला आणि राजवाड्यात परतला. एक दिवस प्रिन्स आपल्या किल्ल्याशेजारीच जंगलात शिकारीला गेला होता, तेव्हा एक दरिद्री मनुष्य त्याला तेथे भेटला. त्याच्या खिशात सोन्याचे घड्याळ होते, पण पोटात अन्न नव्हते. प्रिन्स त्याला म्हणाला, “हे तू विकत ना नाहीस? “ तेव्हा त्या माणसाने सांगितले, “लढाईत मी एका माणसाला मदत केली. त्याच्या प्रेमाची आठवण आहे. “ प्रिन्सने घड्याळ आणि माणूस दोन्ही निरखून बघितले आणि दोन्ही ओळखले. तो त्याचा प्राणदाता शिपाई होता. प्रिन्सने त्याला किल्ल्यात नेले, आणि आदरपूर्वक मित्र बनवले. सत्कृत्य सदा बहरत असते.