राम प्रत्यक्ष दिसले तेव्हा...

Date: 
Sun, 10 May 2015

कळे आकळे रूप तें ज्ञान होतंा।
तेथे आटली सर्व साक्ष अवस्था।
मना उन्मनीं शब्द कुंठीत राहे।
तो गे तो चि तो राम सर्वत्र पाहे।।200।।

याही श्र्लोकाचा अर्थ सरळ आहे. परम शक्तीचे ते रूप ज्ञान झाल्यावर लक्षात येते, पण ते ज्ञान झाल्यावर पाहण्याची अवस्थाच संपून जाते. मन कोठेतरी उंच जाते आणि शब्द कुंठीत होतात. सर्वत्र राम दिसू लागतो.
आपण रोज सूर्यप्रकाशात जगतो. नुसते त्या सूर्याकडे निरखून पाहिले तर डोळ्यापुढे दिसत नाही. त्याच्या तेजामुळे माणूस चकीत होऊन जातो. मग सूर्य-निर्मात्या रामाचे तेज केवढे असू शकेल? खुद्द श्रीरामाची रामदासांची भेट झाली ते अगदी लहान वयाचे असताना. घरी आई किंवा भाऊ कोणीच नसताना त्यांना गावाबाहेर बोलावून नेले. त्यांना हाणमार करीत गावाबाहेर नेण्यात आले. शिबिकेत बसलेल्या एका स्त्रीपुरुषांच्या जोडीपुढे. रजपूती भाषेत श्रीसमर्थांच्या पूर्वाश्रमातील वडिलांची चौकशी केली गेली. आणि मग त्याला जवळ बोलावून एक पत्र दिले. पाहता पाहता दृश्य पालटले आणि श्रीरामदासांना रामपंचायतनाचे दर्शन झाले. तेथे आलेल्या संकटात त्यांना हे जे रामपंचायतनाचे दर्शन झाले, तेव्हापासून श्रीरामदासंाच्या आयुष्याला निराळेच वळण लागले. अवघ्या अकराव्या वर्षी ही घटना घडली.

त्या प्रसंगातच वडील समाधिस्थ झाले अणि भावाने काम आपले कायमचे सोडले. नंतर श्रीसमर्थांनी वर्षभर मौन पाळले. खुद्द त्या अपूर्व रामभेटीच्या वेळी वावटळीचा वारा वहात होता. श्रीरामाने श्रीसमर्थांना महावाक्याचा उपदेश केला आणि मारूतीच्या स्वाधीन केले. पहाता पहाता विजेसारखा लखलखणारा अंगरखा त्यांच्याभोवती गुंडाळला गेला असा हा रामदर्शनाचा महाप्रतापी अनुभ हा श्र्लोक लिहिताना श्रीरामदासांपुढे असला पाहिजे.

मनोबोधाचे ओवीरूप
ज्या कारणें केले नवस। ज्या कारणें केले सायास।
ते पुत्रपितियास। मारिती पाहा।।
ऐसी आली पापकळी। आश्र्चिर्ये मानिलें सकळीं।
उभे तोडिती कळी। नगर लोक।।
पुढें बैसोन पांचजण। वांटे केले तत्समान।
बापलेकांचे भांडण। तोडिलें तेही।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView