लई सस्ती लावलीया..

Date: 
Sun, 17 Mar 2013

बहु चांगले नाम या राघवाचें।
अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचें।
करी मूळ निर्मुख घेतां भवाचें।
जिवा मानवी हें चि कैवल्य साचें।।88।।

एखादी बोरेवाली रस्त्यावरून ओरडत जाते, “लई सस्ती लावली. “ गरीब पोरे बोरे खातात. वर पाणी पितात. मग पुष्कळदा रोख पैसे देऊन घेतलेल्या बोरांनी घसा धरतो. आजार येतो. एखादा बर्फवाला येतो. बर्फ किसून त्यावर कसला तरी रंग शिंपडतो. हा बर्फवाला हे मुलांचे खास आकर्षण! तो बर्फही विकतो आणि रोगही विकतो! अशा इतर वस्तू कमी जास्त प्रमाणात पैसे देताना स्वस्त पण तेवढ्याच महाग म्हणजे अगदी अंतच ओढवण्याची पाळी आणलेल्या असतात. या उलट एखादी गोष्ट खरीखुरी चांगली कशी ठरते्य तर लोकांना ती किंमतीला परवडली पाहिजे, तिच्यात गुण असले पाहिजेत, लोकांच्या ती खरीखुरी उपयोगी पडली पाहिजे. या तिन्ही दृष्टीने रामाचे नाम फारच चांगले आहे, असे दिसेल. श्र्लोकाची पहिली ओळ ते जाहीर करते. मग दुसऱ्या आळीत सांगते, असे हे गोड नाव किती थोडक्यात आणि सोपे आहे? तर ते फुकटच आहे. ते घेतले तर मुळात भवदु:खाचे सर्व कारणच नाहीसे होते. म्हणून मानवी आयुष्यात जे जे काही खरे मिळावयास हवे, ते सर्व हे नाम मिळवून देते. एखादी गोष्ट खरीखुरी चांगली ठरण्यासाठी ती योग्य मूल्यात हवी. ती उपयोगी असली पाहिजे, गुणी असली पाहिजे. या तिन्ही आवश्यकता रामानामात साध्य झाल्या आहेत. एक तर फुकट आणि दुसर सर्व दु:खाचा मुळात नाश करणारे!

मनोबोधाचे ओवीरूप
संसार हाचि दु:खमूळ। लागती दु:खाचे इंगळ।
मागां बोलिली तळमळ। गर्भवासाची।
गर्भवासी दु:ख जालें। तें बाळक विसरलें।
पुढें वाढो लागलें। दिवसेंदिवस।।
बाळपणी त्वचा कोंवळी। दु:ख होताचि तळमळी।
वाचा नाही तये काळीं। सुखदु:ख सांगावया।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView