विषावर अप्रतिम उपाय

Date: 
Sun, 3 Feb 2013

विषावर अप्रतिम उपाय
बहू नाम या रामनामीं तुळेना।
अभाग्या नरा पामरा हें कळेना।
विषा औषध घेतलें पार्वतीशें।
जिवा मानवा किंकरा करोण पूसे।82।।
एक्याऐंशिव्या श्लोकापासून पुढे सुमारे वीस श्लोक रामनामाचे सामर्थ्य केवढे आहे, याची गाथा श्रीरामदासांनी गायिली आहे. शंकराचा उल्लेख श्रीरामदासांनी अनेक वेळा केला आहे. एकतिसाव्या श्लोकात अलिकडे आहे. पस्तिसाव्या श्लोकात पलीकडे आहे. अपरोक्ष संबंध अनेक ठिकाणी आहे. पण साक्षात् आणि सलग संबंध ऐंशिव्या श्लोकापासून पुढे वीस श्लोकांपर्यंत एकूण आठ वेळा आला आहे. 80, 81, 82, 83, 84, 85, 92, 94, 99.
एकतिसाव्या श्लोका पार्वती श्रीरामाचे नामस्मरण करते असे म्हटले आहे. तसा पार्वतीच्या नावाचा उल्लेख पुन्हा ब्याऐंशी आणि ऐशिंव्या श्लोकांत अपरोक्ष आला आहे. तर पंच्याऐंशिव्या श्लोकात स्वत: पार्वतीही श्रीरामनामस्मरण करते असा उल्लेख आहे. शिवपार्वती म्हणजे कोणी सामान्य नव्हेत. एक आदिदेव व एक आदिमाया. त्यांनी रामनाम सामर्थ्याचा स्वीकार केल्याची कथा भागवताच्या आठव्या स्कंधाच्या निमित्ताने आली आहे.
शुक्राचार्यांनी परीक्षित राजाला पाचव्या अध्यायात समुद्रमंथनाचा इतिहास सांगायला सुरुवात केली. बलीकडे नि:शस्त्र देव तहासाठी गेले आणि देव व दैत्य या दोघांनी एकी करून अमृतसिध्दि करून घ्यावी असे ठरले. त्यासाठी समुद्रमंथन सुरू झाले. आणि बाहेर स्वहितार्थ अखेर रामनाम सामर्थ्य घेतले. जेथे देवांचा हा महादेव परमसंकटात रामनाम घेतो, तेथे मानवाची काय कथा, असा श्रीरामदास या श्लोकात सवाल पुसत आहेत.
मानस ज्ञानेश्र्वर
(‘उद्योगसिध्दि ‘मंत्र या साधनेसाठी अध्याय 8 श्लोक 14ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे)
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली। हीव ऐसी करी साऊली।।
ऐसिनि नित्य बुध्दि संचली। मी आणि तयाते।।133।।
अर्थ: त्यांच्यावर आत्मस्मरणाची शांती व शीतल सावली करतो; आणि अशा प्रकारे मी त्यांना त्यांची बुध्दी निरंतर स्थिर व शांत करून देतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView