वेद, राम, आणि महात्मा गांधी

Date: 
Sun, 8 Apr 2012

वेद, राम आणि महात्मा गांधी
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें।
जयाचेनि योगें समाधान बाणे।
तयालागि हें सर्व चांचल्या दीजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।39।।
मनाल वळवण्यासाठी अनेक सूक्ष्म उपाय श्रीरामदास सुचवतात. रामावर पूर्ण भक्ती केली, म्हणजे चंचलता उरूच शकणार नाही. एकाग्र भक्ती करता आली नाही, तर ती भक्तीच नव्हे आणि तशी ती करता आली, तर चंचलता उरणार कोठून? तुम्ही एकदा समर्थ, मर्यादा पुरूषोत्तरम रामापुढे नम्र झालात, की तो तुमची चंचलता शोषून घेतो.
एकाग्र भक्तीची आणखी खूण म्हणजे दाशरथी रामाला दशरथाच्या पलीकडेच, थेट वेदापर्यंत नेऊन ठेवायचा वेदात फक्त विठोबा आहे, असे विधान तुकाराम महाराजांनी करून ठेवले आहे. म्हणजे श्रीरामदास केवढ्या ‘विशाल अर्थाने युक्त एकाग्रता प्रतीक ‘ या भूमिकेतून राम हे नाम वापरीत आहेत! महात्मा गांधींना कोणी विचारले की, दशरथपुत्र राम हाच तुमचा भक्तीविषय राम का? गांधीजींनी उत्तर दिले, “ज्या मूळ शक्तीचे नाव दशरथाने आपल्या पुत्राला दिले, तिचा मी भक्त आहे आणि म्हणून त्या रामाचाही आहे. “ या श्लोकातला वेदांनी रामस्तुती केल्याचा उपदेश या विशाल आणि दुसऱ्या अर्थाने समजून घ्यायला हवा. एका दृष्टीने इतकी विशाल आणि दुसऱ्या दृष्टीने सूक्ष्म एकाग्रता रामाच्या नावाने करता आली; म्हणजे साहजिकच समाधान सुरू झाले आणि चांचल्या संपले; म्हणून मनाला सांगायचे की, तुझे वास्तव्य रामाच्या ठिकाणीच असू दे.
मानस ज्ञानेश्र्वर
(‘आप्तवियोग शांती ‘मंत्र या साधनेसाठी अ.8 श्लो 2 मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
जै कृष्णचि होईजे आपण। तै कृष्ट होय आपुले अंत:करण।
मग संकल्पाचे आंगण। वोळगती सिध्दि।।10।।
अर्थ: जेव्हा आपण कृष्णरूप होतो, तेव्हा कृष्णच आपले अंत:करण होतो, आणि अशा स्थितीत सिध्दि आपण होऊनच आपल्या संकल्पाच्या घरी चालून येतात.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView