सगळेच खोटे

Date: 
Sun, 30 Oct 2011

मरे येक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तो ही पुढें जात आहे।।
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्यातें।
म्हणोनी जनी मागुता जन्म घेतें।।16।।
शांताबाईंच्या नवऱ्याचे म्हणजे आनंदरावांचे अमेरिकेत ऑपरेशन चालले होते. त्या ऑपरेशनमध्ये त्यांची हृदयक्रिया बंद पडली. घाईघाईने शेजारी असलेल्या भावाने अमेरिकेतून भारतात शांताबाईंना निधनाची तार केली. तार करून बंधू परतात तर डॉक्टरांनी अनेक तऱ्हेची कौशल्य वापरून आनंदरावांची हृदयक्रिया पुन्हा सुरू केली होती. पुन्हा बंधू धावले आणि दुसरी तार भारतात धाडली. त्याचा उपयोग नव्हता. शांताबाई पहिल्याच तारेच्या धक्क्याने गतप्राण झाल्या होत्या! त्यांच्या मृत्यूची बातमी आनंदरावांच्या बंधूना देणारी तारही भारतातून सुटली होती.
ती तार एक आठवड्यानंतर आनंदरावांना समजली, तेव्हा ते खरोखरीच आटोपले.
जग हा मरणाला भिणाऱ्या माणसांचा घोळका आहे. मेण जाणणे हे लांंबच राहिले पण कालगतीने ते आल्यावरही, त्याचे स्वागत रडण्यानेच होत असते. रामदास समजावून सांगतात की, अरे, तू दुसऱ्याच्या मरणाचा शोक करता करता स्वत: मरत आहेस ना? तुला चिंता असली पाहिजे ती मरणाची नव्हे, तर तू जन्म कसा चांगला घालवशील याची. पण तो जन्म तू वायद्यात आणि विलासात घालून मोकळा होत आहेस. पुन:पुन्हा चढ्या आकड्यांचा लिलाव बोलण्यासाठी नवे नवे जन्म घेण्याची आशा करीतच, तुझे सुखाचे मनोराज्य तू मरणाच्या गादीवर बसून भोगीत आहेस. गादी बदलण्याची वेळ आली की रडतोस, पण शहाणा कंाही होत नाहीस.
मानस ज्ञानेश्र्वर
(‘भाग्य स्वप्न मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 7, श्लोक 24ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटिपेप्रमाणे.)
जेथ उंचावलेनि पवाडें। सुखाचा पैसारू जोडे।
आपुलेनि सुरवाडें। उडों ये ऐा।।155।।
त्या उंच ठिकाणी उड्डाण केल्याच्या पराक्रमाने सुखाचा असा मोकळा विस्तार आपल्याला लाभतो की मग आपल्या आनंदाच्या भरात वाटेल तशी भरारी मारावी.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView