गर्भसंगीत-नवीन (ऑडिओ सीडी)

Rs.315.00
गर्भसंगीत (नवीन)

गर्भसंगीत-नवीन (ऑडिओ सीडी)
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. ३१५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

मंत्र, संगीत आणि शुद्धस्वर या माध्यमातून गर्भस्थ बालकाच्या सुरेल स्वागतासाठी आणि संस्कारासाठी.

संशोधन, संकल्पना व निर्मिती:- श्री. गजानन केळकर
संगीत संकल्पना:- सौ. अंजली मालकर
संगीतकार:- श्री. किशोर कुलकर्णी
निवेदन:- सौ. प्रज्ञा केळकर
गायत्री मंत्र:- श्री. सुधीर फडके
गर्भोपनिषद:- श्री. दिनकर जोशी
गायन:- श्लोक: श्री. किशोर कुलकर्णी व समूह शास्त्रीय:- सौ. अंजली मालकर
साथ संगत:- पखवाज:- श्री. प्रसाद जोशी. तबला:- श्री. विवेक भालेराव.
हार्मोनियम:- श्री. मिलिंद गुणे
वाद्य:- बासरी: श्री. संदीप कुलकर्णी. संतूर:- श्री. दिलीप काळे सतार- सौ. संध्या फडके
संगीत संयोजन:- श्री. मिलिंद गुणे
ध्वनीमुद्रण:- श्री. ओंकार केळकर, 'शिवरंजनी' पुणे
मूळ देणगीमूल्य:- रु. ३१५/- (कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.)

गर्भसंगीत सीडीची ही दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती २००२ साली डॉ. स्नेहलताताई देशमुख यांच्या हस्ते प्रकाशित झाली होती. (ती यथे उपलब्ध आहे). गेल्या बारा वर्षात शास्त्रज्ञांना पोटातील बाळाच्या गरजा अधिक विस्ताराने कळल्या. त्या सगळ्या संशोधनाचा आधार घेत आताचे नवीन गर्भसंगीत बनविलेले आहे. यामध्ये गर्भवती स्त्रीने ऐकण्यासाठी तीन सीडीज बनविल्या आहेत. प्रत्येक तिमाहीला (ट्रायमेस्टर) एक, याप्रमाणे गर्भाच्या बदलत्या गरजांची दखल घेत, हे गर्भसंगीत बनविले आहे.

गर्भसंगीतामुळे गर्भाच्या मेंदूला चालना मिळते. विशेषतः उजवा मेंदू हा उद्दिपित होतो. त्याचा परिणाम मेंदूचे दोनही भाग (डावा मेंदू आणि उजवा मेंदू) अधिक कार्यक्षम होतात. त्यामुळे बाळाची निर्णय प्रक्रिया चांगली होते. एकांगी निर्णय होत नाहीत. त्याची शिकण्याची क्षमताही वाढते.

याबरोबरच गर्भोपनिषद, गायत्री मंत्र, येथपासून ते वेदांमधील सामाजिक एकता सांगणाऱ्या ऋचा यांचे सुरेल गायन या सीडीमध्ये ऐकण्यास मिळेल. या सीडी सोबत दिलेल्या रंगीत पुस्तकात संस्कृतमधील श्लोक, मंत्र व त्याचा अर्थ दिलेला आहे. अर्थ समजून श्लोक, ऋचा ऐकाव्यात.

गर्भसंगीताच्या या सीडीज् गर्भवती महिला व बाळांना तर उपयोगी पडतीलच परंतु अन्य लोकांनाही उपयुक्त आहेत. उदा. मनामध्ये ताण निर्माण झाला असता, शांत रसामधील सीडी क्र. एक व दोन उपयुक्त ठरतील, तर मनामध्ये नैराश्य डोकावत असेल तर तिसऱ्या क्रमांकाची वीर रसातील सीडी चैतन्य, उत्साह निर्माण करील.

&nbsp

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView