आमच्याबद्दल थोडेसे

Manashakti Research Centreमहाराष्ट्रात पश्चिम घाटात सह्याद्री माथ्यावर मुंबई-पुणे हमरस्त्याला लागून लोणावळा शहराच्या निसर्गरम्य परिसरात ‘न्यू वे’चे मनशक्ती प्रयोग केंद्र कार्यरत आहे. गेली चाळीस वर्षे मनशांतीकरीता हजारोंच्या संख्येने लोक येथे येत आहेत. ताणमुक्त व अर्थपूर्ण जीवनासाठी, गर्भसंस्कारापासून मृत्यृ-पश्चात जीवनापर्यंत तीस प्रकारचे अभ्यास वर्ग आणि किमान साठ इलेक्ट्रॉनिक यंत्रे व कम्प्युटर आधारित चाचण्या (टेस्टस्) येथे चालू असतात.

या प्रयोग केंद्रातील ‘न्यू वे’ तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने जीवनाकडे पाहण्याचा ‘नवा’ दृष्टीकोन लाभतो.
‘मनशक्ती रेस्ट (रिसर्च, एज्युकेशन, सॅनेटोरियम ट्रस्ट) न्यू वे’ ही सामाजिक कार्य करणारी विश्वस्त संस्था पुणे येथे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदलेली आहे.

ट्रस्टचे उद्दीष्ट

‘त्येन त्यक्तेन भुञ्जिथाः।‘ या ईशावास्य उपनिषदात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिला त्याच्या कुटुंबाची रास्त जबाबदारी पार पाडतांना, समाजासाठी काही किमान त्याग करून सुख शांती कशी मिळविता येईल याचे मार्गदर्शन करणे. त्याद्वारे व्यक्ती कल्याण, कुटुंब कल्याण, राष्ट्र व मानवता कल्याण साधणे.

‘न्यू वे’ च्या विश्वस्त संस्था

 • मनशक्ती न्यू वे आश्रम (रजि. नं. र्ई-४३७ पुणे)
 • मनशक्ती रेस्ट न्यू वे (रजि. नं. र्ई-५२४ पुणे)
 • हेल्थ न्यू वे (रजि. नं. र्ई-७३३ पुणे)

समाजाकरिता ‘सोळा जागत्या तासातील एक तास’ म्हणजे सव्वासहा टक्के श्रम किंवा धन, निरपेक्ष व नियमित त्याग करणाऱ्यांना साधक म्हणतात. या साधकांमधून दर दोन वर्षांनी लोकशाही पद्धतीने ‘कार्यकारिणी’ निवडली जाते. विश्वस्त संस्थांची उद्दीष्टे ही आहेत.

स्वामी विज्ञानानंद (१९१८ ते १९९३)

स्वामी विज्ञानानंद हे ‘न्यू वे’ चे प्रथम तत्त्वचिंतक. त्यांनीच मनशक्ती प्रयोग केंद्राची स्थापना केली . स्वामीजींनी ‘मना’बाबत प्रदीर्घ संशोधन केले. विज्ञानामध्ये जडाची व्याख्या आहे पण अजडाची (मनाची) व्याख्या नाही. स्वामीजींनी प्रथमतः वैज्ञानिक सूत्रांचा आधार घेऊन मनाची व्याख्या केली. प्रकाश वेगाची मर्यादा जडाला असते, तर प्रकाश वेगापलिकडेही जाऊ शकते ते ‘मन’.
स्वामीजींनी संन्यासोत्तर काळात पाच भाषांमध्ये २५० वर ग्रंथ व अनेक वृत्तपत्रांत स्फुट लेखन केले. त्यांच्या लेखनातील विचार जागतिक तज्ज्ञांनी मानले. स्वामीजींनी १९९३ मध्ये एका विशेष पद्धतीने प्रकाशसमाधी घेतली.

‘मनशक्ती’ केंद्राच्या अधिकृत शाखा

 • मुख्य प्रयोग केंद्र – लोणावळा, वरसोली
 • शक्ती –शांती स्थळ – लोणावळा (मनशक्ती न्यू वे आश्रम)
 • शरीर-मन स्वास्थ केंद्र – तळेगाव (मनशक्ती रेस्ट न्यू वे संचलित)
 • ग्रामसेवा समिती केंद्र – चाकण (मनशक्ती रेस्ट न्यू वे संचलित)

मनशक्तीच्या कार्य कक्षा

 • इलेक्ट्रॉनिक यंत्रे व कम्प्युटर आधारित वैज्ञानिक, मनसंबधित चाचण्या
 • विविध शिबिरे, चर्चासत्रे, कार्यशाळा, अभ्यासवर्गांचे आयोजन.
 • शक्तीचे अविनाशित्त्व या तत्त्वावर आधारित, सामुदायिक पद्धतीने वास्तुशमन, सत्यनारायण पूजा व श्राद्धपूजा.
 • इच्छापूर्तीसाठी प्रकाश शक्तीवर आधारित ज्ञानयज्ञ व प्रकाश एकाग्रता उपक्रम
 • ग्रंथ – इंग्रजी, मराठी, गुजराथी, हिंदी, इत्यादी भाषात २५० वर विविध ग्रंथसाहित्य उपलब्ध.
 • ‘मनशक्ती’ मासिक पाठ प्रकाशन – विशेष दिवाळी अंकासह.
 • स्मरणशक्तीवर्धक व इतर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती.
 • आदिवासी व अन्यायितांसाठी स्वावलंबन योजना
 • तरुण पिढीसाठी ‘युवा स्वावलंबन’ व ‘युवक कल्याण’ योजना

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView