ताणमुक्ती व ध्यान कार्यशाळा

व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, नोकरदार, अधिकारी, कर्मचारी, गृहिणी, महाविद्यालयीन युवक, गर्भवती भगिनी इ. सर्वांसाठी लाभदायक कार्यक्रम.

कौटुंबिक अशांती, अभ्यासाचा ताण, आजारपण, सहकार्यां्शी मतभेद, व्यावसायिक प्रश्नी, सामाजिक असुरक्षितता अशा अनेक समस्यांमुळे आपले जीवन ताणयुक्त झाले आहे. कार्यशाळेमध्ये ताणमुक्तीचे उपाय सांगितले जाणार आहेत. तसेच प्रत्यक्ष ध्यानही घेतले जाणार आहे.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये –

  • ताणनिर्मितीची कारणे आणि परिणाम
  • ताणमुक्तीसाठी ध्यानशांती आणि अन्य उपाय
  • ध्यान प्रक्रिया माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव
  • माहिती आणि ग्रंथसाहित्य प्रदर्शन.

मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या शरीराशी संवाद या अपूर्व ध्यानपद्धतीचे लाभ -

  • मन व शरीरावरील ताण कमी होतात
  • मनावर संयम ठेवण्यास उपयुक्त
  • निर्णय घेण्याची क्षमता वाढते
  • एकाग्रतेमुळे आपल्या कार्यशक्तीत वाढ होते.
  • भय रागाचे उद्रेक कमी होण्यास मदत होते.

देणगीमूल्य : रु. 415/- प्रति व्यक्तीस

&nbsp

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

‘‘ताणमुक्ती व ध्यान कार्यशाळेत येऊन, अनेक मनातील अनुत्तरीत प्रश्नां ची उत्तरे मिळाल्यामुळे, खरोखरच मानसिक आनंद मिळाला. ध्यानाच्या अभूतपूर्व अनुभवातून ताणमुक्तीचा आनंद मिळाला. खरोखरच आपण घेत असलेल्या अनावश्यक ताणांची ओळख झाली व पटली. आयोजकांचे व खास शिबिरासाठी लोणावळ्याहून आलेल्या सर्व श्रेष्ठींचे आभार. मी पण या अनुभवातून माझा व माझ्या संपर्कातील सगळ्यांना ताणमुक्त करून, ‘सर्वे सन्तु निरामया:’ चा प्रत्यय आणीन. धन्यवाद!’’ - श्री. विजय काशिनाथ पाटे, जळगाव

‘‘मनशक्तीतर्फे आयोजित केलेल्या ताणमुक्ती व ध्यान कार्यशाळेतील प्रत्येक गोष्ट ही विज्ञानावरील संशोधनाची फलनिष्पत्ती आहे. निवेदित केलेली प्रत्येक गोष्ट परिणामकारक असून, मनशक्तीच्या ह्या समाजासाठी असलेल्या वैज्ञानिक प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा!!’’ - श्री. पंकज वसंतराव पाटील, नवी मुंबई

ताणमुक्ती व ध्यान कार्यशाळा
ताणमुक्ती व ध्यान कार्यशाळा
ताणमुक्ती व ध्यान कार्यशाळा

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView