उत्पादने

Kits पुस्तक संच

मनशक्तीची, सुमारे २५० वर पुस्तके आहेत. जन्मपूर्व संस्कार प्रयोगापासून ते मृत्यूपश्चात जीवनापर्यंतचे अनेकविध विषय त्यामध्ये हाताळलेले आहेत. तसेच एकेका विषयावरसुद्धा अनेक पुस्तकं किंवा पुस्तकमाला आहेत. जिज्ञासू, ज्ञानपिपासू व अभ्यासकांना, त्या त्या विषयावरील जास्तीतजास्त ग्रंथ एकत्रित उपलब्ध व्हावेत, म्हणून हे वैशिष्ट्य़ापूर्ण संच तयार केलेल आहेत.

CDs सीडीज

गर्भस्थ बालक - मुले - पालक - प्रौढ - ज्येष्ठ नागरिक अशा लहान-थोर सर्वांसाठीच, मनशक्तीने काही खास सीडी-कॅसेटस्‌ काढलेल्या आहेत. गर्भसंस्कार, संस्कार कथा, प्रार्थना, ध्यान, योगासने, संगीत आधारित अभ्यासपद्धती, रामायण, मनशक्ती केंद्राची डॉक्युमेंटरी असे विविध विषय त्यामध्ये हाताळलेले आहेत.

Experimental Products.jpg प्रयोगात्मक साहित्य

मनशक्ती प्रयोगकेंद्रात, मनाला शक्ती आणि शांती दोन्हीही मिळण्यासाठीचे अत्यंत कल्पक, मनोरंजक मात्र विज्ञानाधारित प्रयोग केले जातात. त्यासाठी प्रयोगकेंद्राने, घरच्या घरी वापरण्यासाठी काही खास प्रयोगात्मक साहित्य तयार केलेल आहे. एकाग्रताशक्ती व कार्यक्षमता वाढविणे, मेंदूचा सर्वांगीण विकास, गर्भसंस्कार, रोगमुक्ती, व्यसनमुक्ती, वास्तुशुद्धी, शेतातील पीक वाढविणे इत्यादी विविध गरजांसाठी ते उपयोगी आहे.

Ayurvedic Products आयुर्वेदिक उत्पादने

मनशक्तीच्या `हेल्थ न्यू वे' या नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे, आयुर्वेदीय औषधे उत्पादित केली जातात. अन्न व औषध प्रशासन, पुणे यांच्या परवान्याप्रमाणे ती तयार केली जातात. मेंदू वा शरीराची शक्ती वाढविणे, त्वचा व केसांचे आरोग्य चांगले राखणे, दंत-शुद्धी, मुख-शुद्धी, पोट शुद्धी, जखमेवर इलाज इत्यादी त्याचे अनेक उपयोग आहेत. ही रसायने बुद्धिवर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, पित्तशामक आहेत.

Ruchi Prayog, Lonavla रुचि प्रयोग

मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या प्रवेशद्वारापाशीच वैशिष्ट्य़ेपूर्ण असा खाद्य पदार्थांचा प्रयोग विभाग आहे. तेथील पदार्थ संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत सुप्रसिद्ध आहेत! परंतु हे हॉटेल नसून ``रुचि-प्रयोग आहे. मनशक्ती केंद्राला रोज भेट द्यायला येणार्‌या लोकांची सोय, तसेच अन्य मनशक्ती संबंधित प्रयोगात भाग घेणार्‌यांच्या सोयीसाठी ते आहे. प्रत्येकाला योग्य अन्न कोणते ते ठरवता यावे अशी प्रयोगात्मक भूमिका समूजावून घेऊन, व्यक्ति वा समाजाचे आरोग्य चांगले राहावे हा त्यामागील उद्देश.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView