उपक्रम

Machine Tests मशिन टेस्ट

लोणावळा येथील प्रयोगकेंद्रात घेण्यात येणाऱ्या चाचण्या या अजोड आहेत. त्यातल्या बऱ्याच चाचण्या या मानसिक (मनाच्या) पातळीवर असतात. चाचणी करून घेण्याचा उद्देश ‘त्या त्या व्यक्तीच्या मनाच्या शक्तीचे मूल्यमापन व आंतरशक्तीची जुळवणूक’ असा आहे. चाचण्या घेण्यासाठी लागणारी यंत्रे (मशिन्स) प्रयोगकेंद्रातच बनवलेली आहेत.

study-course अभ्यासवर्ग

अनेक वर्षांच्या संशोधनातून साकारलेले माणसाच्या सुखाचे गणित म्हणजे ‘न्यू वे’चे अभ्यासवर्ग. माणसांच्या संकटांवर उपाय सुचविणारे, संकटे येऊ नयेत म्हणून कसे वागावे हे सांगणारे. पदार्थ-विज्ञानशास्त्र, गणित, तर्कशास्त्र या विज्ञानत्रयींच्या आधारे मांडलेले सिद्धान्त हे प्रत्येक वर्गाचे खास वैशिष्ट्य.

workshops कार्यशाळा

मनशक्तीतर्फे, समाजातील शहरी आणि ग्रामीण परिसरात, वेगवेगळ्या वयोगटांसाठी, विविध विषयांवर एक दिवसीय कार्यशाळा, दृक्‌श्राव्य पद्धतीने घेतल्या जातात. त्या त्या विषयांवरील ताजे संशाधन, प्रयोग, अभ्यास आणि या सगळ्यांवर आधारित उपाय-योजना, या अत्यंत लोकप्रिय कार्यशाळांमध्ये सांगितली जाते.

pooja पुजा उपक्रम

विज्ञानातल्या रेझोनान्स या नियमाप्रमाणे, सामुदायिकतेने, गुणित शक्तीचा लाभ मिळतो. त्यामुळे मनशक्ती प्रयोगकेंद्रात सर्व पूजा उपक्रम सामुदायिक घेतले जातात.

free-activity विनामूल्य उपक्रम

मनशक्तीच्या अन्यायित स्वावलंबन विभागातर्फे, आदिवासींना स्वावलंबी करण्यासाठी, तसेच ग्रामीण परिसरातील अनाथ - गरीब - व गरजू विद्यार्थी यांसाठी विविध विनामूल्य उपक्रम राबविले जातात. उदाहरणार्थ, शिक्षण संस्कार शिबिर, कमवा शिका योजना, वैद्यकीय शिबिरे इ.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView