अभ्यास यश-संगीत
विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी, ‘मनशक्ती’तर्फे अभिनव -
“अभ्यास यश-संगीत” कॅसेट / सीडी प्रसिध्द!!
(सोबत इअरफोन्स भेट!)
“अभ्यासाला बसलं, की मन एकाग्र होत नाही; मनात वेगवेगळे विचार येतात; एका जागेवर फार वेळ बसवत नाही ... “ अशी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्यावर उपाय म्हणून, ‘मनशक्ती’ प्रयोगकेंद्राने, खास ‘अभ्यास यश-संगीत’ पध्दत विकसित केली आहे!
‘अभ्यास यश-संगीत’ कॅसेटमध्ये, ‘निसर्गातील संगीत, तसेच काही ‘विशिष्ट ध्वनी-कंपनां’ चे सहाय्य घेतले आहे. मुख्य म्हणजे, संगीताच्या सुरेलपणाऐवजी संगीतातील ‘विशिष्ट ध्वनी-कंपनां’ वर (frequency)जास्त भर दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनाच्या विशिष्ट अवस्थांप्रमाणे सुध्दा संगीत उपलब्ध करून दिले आहे. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाची, विशिष्ट विषयाची भीति वाटत असेल, तर धबधब्याचे, पावसाचे संगीत ‘White Noise’या प्रकारातून वापरले आहे; तर चंचल, अशंात प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी, मन शांत करणाऱ्या ‘समुद्राच्या लाटा’ या लयबध्द संगीत म्हणून वापरल्या आहेत. विद्यार्थ्याने अभ्यास करतेवेळी, हे संगीत इयरफोनद्वारे (Earphone) ऐकायचे आहे.
अशा या संगीताच्या पाश्र्वभूमीवर अभ्यास केल्यास, मन विचलित करणारे अन्य विचार हळूहळू कमी होत जातात, अभ्यासाची किंवा एखाद्या विषयाची वाटणारी भीति कमी होते व आपण करत असलेल्या अभ्यासात अधिक चांगले लक्ष लागते. एकाग्रतेबरोबरच, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि आत्मविश्र्वाससुध्दा वाढायला मदत होते! अधिक माहितीसाठी येथे gsk@manashakti.org ईमेल करा.
(अभ्यास ‘यश-संगीत कॅसेट‘ / सीडी दोन्हीचे सवलत देणगीमूल्य : रू.150, कुरिअर चार्जेस स्वतंत्र.)