जन्मपूर्व संस्कार

Prenatal Education

आपलं होणारं मूल कसं असेल, ते कसं दिसेल, कोणासारखं होईल, कोण होईल हे प्रश्र्न जसे त्या आईला भेडसावत असतात तसाच आणखी एक प्रश्र्न तिच्या सुप्त मनात कुठेतरी असतो (असायला हवा) की, आपलं बाळ गुणी होईल ना? त्या दृष्टीने त्या नऊ महिन्यांच्या काळात ते दोघं आपापल्या परीने येणाऱ्या बाळाची पूर्वतयारी करत असतात. रामायण-महाभारताचं पारायण, उत्तमोत्तम पुस्तकांचं वाचन, श्र्लोकांचं पाठांतर, रामरक्षा-गीता आदींचं पठण, इत्यादी पण त्याच वेळेस, आईवडिलांचीच गुणसूत्रं त्या बाळात संक्रमित होणार आणि साधारण आपल्या गुण-दोषांचं एकत्रीकरण होऊनच ते जन्म घेणार हा विचार त्यांच्या प्रत्येक विचाराच्या केंद्रस्थानी असतो. साहजिकच त्यांच्या वागण्यावर मर्यादा येतात. पण हेच नऊ महिने त्या दोघांनी बाळाशी, त्या बाळाच्या मनाशी संवाद साधला तर... हे सहजशक्य आहे, कारण गर्भातील बाळ आपल्या आईशी बोलू शकतं, त्याला सगळं समजतं, त्याची ग्रहण करण्याची शक्ती प्रचंड असते, असं आता सिध्द होत आहे.
लोणावळा येथील ‘मनशक्ती न्यू वे आश्रम’ या दृष्टीने एक उपक्रम राबवीत असून गेली 35 वर्षे सातत्याने प्रयोगशील राहिला आहे. आईच्या पोटातून मूल बोलते व ऐकू शकते, हे या प्रयोगामागचे मूळ तत्व आहे. विचारांचा परिणाम गर्भावर होऊ शकतो, तसेच गर्भावस्थेतील मुलाशी संवाद साधता येतो, त्यांना भावनांची जाणीव असते या सर्व गृहितकांच्या आधारावर केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी 1968 पासून प्रयोगांना सुरुवात केली. तेव्हा त्यांच्याजवळ होती फक्त विचारदृष्टी. साधनांचा अभाव होता, संशोधनाचीही वानवा होती. सुरुवातील अगदी छोट्या प्रमाणावर हे प्रयोग त्यांनी केले. आता 1983पासून विविध यंत्रसामग्रीच्या सहाय्याने संशोधन आणि विश्र्लेषण करून स्वत:चं एक आगळंवेगळं तत्वज्ञान जगासमोर सिध्द करून मनशक्ती केंद्र बाळांवर जन्मपूर्व संस्कार करण्यासाठी, एक तेजस्वी पिढी घडवण्यासाठी ठामपणे उभे आहे.
‘जन्मपूर्व अवस्थेत गर्भाला कळू शकतं म्हणून जन्मपूर्व संस्कार करणं शक्य आहे’ या संकल्पनेवर आधारित हा अभिनव उपक्रम आहे. जन्मपूर्व संस्कार म्हणजे मानस प्रयोगमनावर केलेला प्रयोग. माणसाचं मन स्थिर असेल तर कुठल्याही प्रसंगाला बिनदिक्कत सामोरं जाण्याची ताकद त्याच्यात असते. मनाची ही शक्ती वाढविणं म्हणजे चांगले संस्कार करणं. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार!
शास्त्रज्ञांच्या मते बाळाचं मन खूप संवेदनशील असतं. तुम्ही द्याल ते ग्रहण करण्याची अफाट क्षमता त्याच्या ठायी असते. देता किती देशील दो करांनी इतकं घेण्यास ते आसुसलेलं असतं. त्यामुळे बाह्य वातावरणाचा, त्याचबरोबर त्याच्या आईबाबांच्या विचारांाचा सर्वतोपरी परिणाम त्याच्यावर होतो. जन्माच्या प्रक्रियेमध्ये गर्भ किंवा येणारा जीव याची भूमिका फक्त बघ्याची नसते. प्रत्येक प्रक्रियेत तो हिरीरीने भाग घेत असतो. एवढंच नव्हे तर जन्माला येण्याची वेळसुध्दा तो स्वत: ठरवत असतो. स्पर्श, वास, श्रवण आणि चव या चारही संवेदनांची जाणीव बाळाला गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यापर्यंत आलेली असते. जन्मपूर्व अवस्थेत त्याची शारीरिक आणि मानसिक शक्ती इतकी प्रचंड असेल तर त्याच्या विचारांना वळण लावण्याची वेळ ही जन्मपूर्वच असली पाहिजे. कारण गर्भातील प्रत्येक बाळ हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यालाही एक स्वतंत्र अस्तित्व आहे. मग ते अस्तित्व अधिक संस्कारक्षर करणं हे आपलं कर्तव्य ठरंत, त्याला योग्य ती दिशा ज्यामुळे जन्माला येताना तो परिपूर्ण अस्तित्व घेऊन जन्माला येईल, हा विचार मनशक्तीच्या प्रयोगाचा मूळ गाभा आहे.
मनशक्तीच्या सूत्राप्रमाणे लग्न झाल्यावर लगेचच तरुण-तरुणींनी या केंद्रात यायला सुरुवात करावी, म्हणजे भविष्यात त्यांनी काय करायला हवं याची आखणी त्यांना आधीपासूनच करता येईल. प्रत्येक पालकाची सर्वसाधारणपणे अशी इच्छा असते की, आपलं मूल सर्वगुणसंपन्न व्हावं, त्यासाठी पालक स्वत: जागरूक होतील अशी पूर्वतयारी त्यांच्याकडून करून घेतली जाते. तशी वातावरण निर्मिती केली जाते. ही तयारी करण्यासाठी आई-बाबा आणि त्या संपूर्ण कुटुंबासाठी तीन दिवसांचं शिबीर मुख्य केंद्रातर्फे (लोणावळा) घेतलं जातं. गर्भधारणा झाल्या दिवसापासून किंवा ते शक्य नसल्यास सातव्या महिन्यात गर्भाची बरीचशी वाढ पूर्ण होत असल्याने, सहा महिने पूर्ण झालेली स्त्री या प्रयोगातून भाग घेऊ शकते. या प्रयोगाच्या सुरुवातीलाच संस्कारामागचा हेतू नीट समजावून सांगितला जातो आणि एका विशिष्ट तऱ्हेने संस्कार-विचारांचे प्रक्षेपण गर्भावर केलं जातं.
सगळ्यात आधी या भावी आई-बाबांना एक त्रिसूत्री दिली जाते आणि या आधारे पूर्ण नऊ महिने त्यंाचे आचरण असले पाहिजे हे सांगितले जाते.

  • विशिष्ट विचार स्पंदनांनी येणाऱ्या गर्भाचे स्वागत - आपल्या घरी एखादा पाहुणा येणार असेल तर त्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाते. त्या स्वागताने तो पाहुणा कृतकृत्य होतो. तसंच स्वागत आपल्या बाळाचं करायला हवं.
  • बाळावर संस्कार – बाह्य बातावरणाचा परिणाम चांगला व्हावा हा विचार करून त्या घरातलं वातावरण सदा आनंदी, खेळकर, हसतमुख असायला हवं.
  • माता-पित्यांना धीर आणि मनोबल - आई-वडिलांनी रोजच्या आयुष्यातले मानसिक ताणतणाव, धावपळ यांचा बाऊ न करता स्थिर मन:स्थितीने परिस्थितीला सामोरे जायला हवं, परस्परांमधील सामंजस्याने बाळाच्या स्वागताची तयारी करायला हवी. मुळातच आपल्याला बाळ हवं आहे ही त्या दोघांची तयारी हवी. मानसिक स्तरावर त्या दोघांचं एकमेकांशी साहचर्य हवं. अशा समविचारी, शांत भावना त्यांच्यात निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात.

ही त्रिसूत्री दिल्यानंतर ही सगळी उद्दिष्टं साध्य करण्यासाठी दोन चाचण्या आणि गर्भवती स्त्रीसाठीची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली जाते. पालकांची एकाग्रता वाढविण्यासाठी गर्भधारणेच्या पहिल्या सहा महिन्यांत स्ट्रोबोस्कोप चाचणी घेतली जाते. फीटस्स्कोप चाचणी शेवटच्या सहा महिन्यांत होते. स्ट्रोबोस्कोप हे उपकरण चलित वस्तूंची गती मोजण्यासाठी वापरलं जातं. प्रसिध्द न्यूरॉलॉजिस्ट डॉ. वॉल्टर ग्रे यांनी मेंदूविषयी संशोधन करताना सर्वात प्रथम याचा उपयोग केला. रंगावर मन एकाग्र केल्यास आपण आपली शक्ती वाढवू शकतो असे लक्षात आल्यावर या प्रयोगाला सुरुवात झाली. हा प्रयोग 10-12 जणांच्या समूहात केला जातो. यंत्रातून एक विशिष्ट रंगाचा प्रकाशझोत बाहेर टाकला जातो आणि प्रत्येक पालकाने आपल्या मुलाचं, त्याच्या भवितव्याचं चिंतन करीत त्या झोतावर मन एकाग्र करायचं. या प्रयोगामुळे मेंदूतील सगळ्या संवेदना जागृत होतात आणि बौध्दिक, मानसिक संतुलन वाढतं.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView