दीर्घ-श्र्वसन पध्दत

Deep-Breathing

यशासाठी, मन शांत करावयाची दुसरी पध्दत -दीर्घ-श्र्वसन पध्दत

‘स्थिर माध्यम गटा’ पैकी ही पध्दत आहे. वास्तविक दोन तीन पध्दती सोडल्या तर, आपण पहात असलेल्या सर्व पध्दती, नास्तिकांसाठी उपयोगात येऊ शकतील.ही पध्दत त्यातल्या त्यात अधिक प्रत्ययकारी असल्याने, तिचे महत्त्व पटेल.
मनुष्याचा जिवंतपणा, शरीरातील विविध गतींवर अवलंबून असतो. मेंदूतील असंख्य पेशी, अखंडपणे विद्युत्-निर्मितीचे काम करीत असतात. झोपेतसुध्दा ही क्रिया चालू असते. शास्त्रज्ञांना हे 1874सालापासून माहिती आहे. हॅन्स बर्गरच्या अभ्यासाने 1929साली ते पुराव्यासहित सिध्द झाले. मेंदूची गती ही तुलनेन, शरीरातील इतर गतीप्रकारांपेक्षा प्रचंड असते. म्हणून शांती-साधनेसाठी त्यापेक्षा इतर गतिप्रकार शोधणे योग्य आहे.
ह्रदयाची गती श्वासोच्छवासावर अवलंबून असते. तो श्र्वासोच्छवास अंतर्बाह्य अनुभवास येतो. यास्तव, याचा आधार घेऊन एखादी शांती-साधना ठरविणे सोईचे होईल. दीर्घ-श्वासाचा उपाय अलीकडे चिकित्सक सांगू लागले आहेत.
डॉ.बाथ फ्रॉलॉव्ह या रशियन तज्ज्ञाने “वर्क अँड दी ब्रेन” मध्ये श्वसनानुरोधाने मिळणाऱ्या शांतीची प्रशंसा केली आहे. त्याच ग्रंथशत त्याने चीनमधील श्वसन-चिकित्सेचा उल्लेख केला आहे. भारतात तर पतंजलाने या अनुरोधशने मूलग्राही विवेचन केले आहे.
मन:शांतीचा हा उपाय करताना, दिवसभरातील एकतरी वेळ कायम ठेवावी. एक ठराविक वेळ कायम राखण्याने, एक तऱ्हेची वातावरण संगती निर्माण होईल. मांडी घालून ताठ बसावे. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावेत. पाठीचा कणा वरपासून खालपर्यंत ताठ राहावा. मानेपासून वरचा भाग त्याच रेषेत ठेवावा. पाठीचा कणा ताठ ठेवून, नासिका-रोगासाठी अथवा अन्य रोगासाठी भस्रिका किंवा अन्य व्यायाम करावयाचे नसतील तेव्हां, नाकपुड्यातून श्र्वास बाहेर पडताना त्यावर लक्ष केंद्रित करावे. अशावेळी डोळे अर्धवट उघडे ठेवण्याची काहीवेळा सूचना दिली जाते. पण त्याची आवश्यकताच आहे असे काही नाही. डोळे पूर्णपणे मिटलेले ठेवण्यासा काही हरकत नाही. श्वास बाहेर टाकण्याच्या आणि तो पुन्हा वर घेण्याच्या क्रियेवर मन स्थिर करावे. ही क्रिया घाई न करता सावकाश करावी. सुरुवातीस फार तर स्वत:शी म्हणावे, “सतत कामाने शक्ति व्यय होतो. हा शक्तिव्यय जागृतपणे म्हणजे जाणीवपूर्वक वाचविण्यासाठी मी स्वत:ला सवय लावून घेणार आहे. त्यामुळे जी शक्ती मला येईल त्यातून कामाला उत्साह मिळेल. “
या पध्दतीप्रमाणे श्रध्देच भाग आवश्यक नसल्याने, सर्व चित्त एकाग्र करणे प्रथम कठीण होईल. उदाहरणार्थ, आजूबाजूचे आवाज ऐकू येऊन मन विचलित होईल. अशावेळी श्वासोच्छवास करताना तो ‘ऐकण्याकडे’ मन गुंतवावे.
हळूहळू त्या सर्व क्रियेशी मन मिळून गेल्याचा शंात अनुभव येईल.
वर म्हटल्याप्रमाणे, यात देवकल्पना किंवा श्रध्दा यांचा संबंध नाही. श्वास घेताना व सोडताना त्यावर चित्त गुंतविण्याची युक्ती स्वयंप्रामाण्यवादी आहे. तिचा अनुभव कोणालाही सुलभतेने घेता येईल. त्या अनुभवाची प्रशंसा विचारवंतांनी केली आहे. या पध्दतीने आरोग्य आणि शांती दोन्हीचाही अधिक लाभ होईल.
विशेषत: कठोर, निर्भीड, मायेत हळव्या मनाच्या लोकांसाठी ही पध्दत अधिक लाभदायी आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView