निद्रा-शिक्षण

Education through Sleep

(विद्यार्थी तसेच इतरांनाही उपयुक्त पध्दत)

‘झोपेतून शिक्षण’ आज अनेक देशात चालू आहे. या पध्दतीप्रमाणे, मेंदूची शांत स्थिी जाणण्यासाठी पुष्कळदा इइजी (इलेक्ट्रो एन्सिफॅलो ग्राफ) यंत्राचा वापर करतात. त्यामुळे मेंदूची शांत स्थिती कळते व तेव्हा अभ्यासाच्या कॅसेट लावता येतात. या पध्दतीप्रमाणे झोपेतून शिक्षण द्यायचे म्हटले तर, झोपेची पूर्ण शांत अशी स्थिती - म्हणजेच “रिव्हेरा पिरिएड” शोधून काढायला, इइजी यंत्र लागेल. त्याचा खर्चच कित्येक लाख रूपये आहे. सामान्यत:, एकेका मुलासाठी इतका खर्च शक्य होणाारा नाही. म्हणून सर्वांंना उपयोगी पडेल, अशी पध्दत पुढे सुचवली आहे.
या पध्दतीला आधार थॉमस बुडझायन्‌स्की या डेनव्हरच्या बायोफीडबॅक इन्स्टिट्यूटच्या तज्ञानाचाही आहे. झोपेपूर्वी जी गुंगीची अवस्था असते, तिला या तज्ञाने ‘ट्विलाईट लर्निंग’ असे नाव दिले आहे.
यामागील तत्व हे की, दिवसा, जागेपणी केलेला अभ्यास, नैसर्गिक झोपेच्या विशिष्ट काळात अधिक दृढ व पक्का करायचा.
त्याची पध्दत अशी - पालकांनी मुलांना अभ्यासाचा अवघड वाटणारा भाग, पूर्ण झोपेच्या किंवा गुंगीच्या अवस्थेत, वाचून दाखवायचा / कॅसेटद्वारा ऐकवायचा. पण जवळजवळ तितकाच प्रभावी आणि स्वावलंबी उपाय म्हणजे, ही पध्दत ज्याची त्याने झोपेपूर्वी व नंतरच्या काळात करायची.
कोणताही अवघह विषय निवडा. समजा, इंग्लिश हा अवघड विषय आहे. त्या विषयांचे तीन भाग करता येतात - एक, तुम्ंहाला पूर्ण चांगला कळलेला भाग. दुसरा, मध्यम कळलेला भाग. तिसरा, अतिशय अवघड वाटणारा भाग. अशावेळी, या तिसऱ्या भागाची सर्वसाधारण टिपणे करावीत. तसेच या अवघड भागाबद्दल, वर्गातील हुशार विद्यार्थ्याला, मित्राला, शिक्षकांना, तज्ज्ञांना विचारत रहा.

आता हा भाग पक्का करण्याची प्रक्रिया लक्षात घ्या -

1. त्या भागातील स्पेलिंग्ज्, चांगल्या कल्पना, चांगले शब्द, इत्यादी लिहून काढा. थोडक्यात, त्या त्या भागाचा सारांश तुमच्या शब्दात लिहून काढा. हा सर्व अभ्यास, झोपेच्या आदल्या तासाला करा. पेंगुळलेल्या स्थितीत केलेत तरी चालेल. किंबहुना, ती पेंगुळलेली स्थिती तुम्हाला फार मदत करत असते.
2. दुसऱ्या दिवशी पहाटे ठराविक वेळेला उठा आणि कालचा भाग वाचून काढा. काही नवीन मुद्दे सुचल्यास, लिहून काढा. झोपेच्या अवस्थेत त्यातला काही भाग तुमच्या डोक्यात मुरलेला आहे, असे तुमच्या हळूहळू लक्षात येईल.
3. या पध्दतीने, पुढला भाग डोक्यात पक्का करत जा. आदल्या दिवशीचा भाग प्रथम पुन्हा आठवायचा आणि नवा भाग त्याला जोडायचा; असे करीत गेल्याने, रोज अभ्यासाची वेळ वाढली तरी तिचा ताण पडणार नाही.
4. या पध्दतीने अभ्यास करत गेलात म्हणजे, तुम्हाला एकातरी अवघड विषयाता पूर्ण आत्मविश्र्वास प्राप्त करता आला असे दिसेल.
5. तत्व हेच कायम ठेवून, इतर विषयांचाही इतर वेळात अभ्यास करा.
या प्रयत्नाला जोड म्हणून, ‘ऋणविद्युत शक्ती’ आणि ‘प्रार्थना’ यांची जोड, ‘मनशक्ती’ तर्फे, विद्यार्थला अवश्य वाटली तरच द्यावी. त्यासाठी, तुम्ही या पध्दतीने अभ्यास करणार असल्याचे फक्त ‘मनशक्ती’ केंद्राला कळवावे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView