बायोथर्मल / जैविकोष्ण प्रवाह

Biothermal-Currents

(विशेषत: विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त)
‘बायोथर्मल करंटस्’ (Bio-thermal currents) ही जीव-मेंदूशास्त्रीय संकल्पना आहे.
‘बायो’ म्हणजे ‘जीव’; ‘थर्मल’ म्हणजे ‘उष्णता’ आणि ‘करंटस्’ म्हणजे ‘प्रवाह’. संकुल मिळून याचा अर्थ असा की, प्रत्येक जीवामध्ये उष्णतेचे प्रवाह असतात.

प्राण्यामध्ये विद्युत्शक्ती किंवा इलेक्ट्रिसिटी असल्याचा पुरावा, लुईगी गॅल्वनी या शास्त्रज्ञाने 19व्या शतकात प्रथम सादर केला. बेडकांवरील प्रयोग करीत असताना, अकस्मातपणे त्याला तसे आढळले व त्याला त्याने ‘ऍनिमल इलेक्ट्रिसिटी’ (Animal Electricity) असे नाव दिले. तेथून आजतागायत, वनस्पती, प्राणी आणि मानवी शरीरातील विद्युताचा, उष्णता प्रवाहांचा (heat currents) सखोल अभ्यास संशोधकांनी केला आहे. (‘वीज’ आणि ’उष्णता’ ह्या एकमेकांत रुपांतरित होऊ शकणाऱ्या शक्ती आहेत.)

माणूस हा मुळात ‘गरम’ रक्ताचा (Warm blooded) प्राणी आहे, हाही त्यातील उष्णता-शक्ती सिध्द करणारा आणखी एख पुरावा आहे.

थोडक्यात म्हणजे, व्यक्तींची मूळ नैसर्गिक शक्ती ही शरीरात, उष्णता-प्रवाहांच्या स्वरुपात वाहात असते.
तुम्हाला आश्र्चर्य वाटेल परंतु, आपल्या शरीरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे तापमान असते! उदाहरणार्थ, तुम्ही एकाच वेळी मेंदू, काख, जांघा आणि तळपाय या ठिकाणचे तापमान मोजलेत, तर त्यात काही अंशी फरक आढळेल. अनेकदा, हा फरक 1अंश सेल्सियस इतकाही आढळतो. तरीही, हे सर्व लक्षात घेऊन, शास्त्रज्ञांनी मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान (normal temperature) हे 37अंश सेल्सियस असे निश्चित केले आहे.

आता प्रश्र्न कुठे निर्माण होतो तर, ताण-तणशव आणि भावनोद्रकांच्या वेळी, शरीरात ह्या नेहमीच्या तापमानात खूप बदल होतो. ‘तळपायाची आग मस्तकात गेलीय्’, ‘डोकं तापलंय्’, ‘रक्त गरम झालंय्’ इत्यादि ह्या सर्व अनुभवसिध्द म्हणी, शरीरातील वाढलेली उष्णताच निर्देशित करतात.
तेव्हा अशी ही वाढलेली उष्णता, विशेेषत: मेंदूत, नेमक्या कोणत्या भागात वाढलेली आहे हे कळल्यास, त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो.

सामान्यत: ही उष्णता, मेंदूतील सहा स्थानातून वेगवेगळ्या प्रमाणात बाहेर पडत असते. ही स्थाने म्हणजे टाळूच्या माग, डाव्या भागाकडून उजवीकडे तीन आणि टाळूपुढे त्याचप्रकारे तीन ठिकाणे आहेत, असे ‘गृहित-कृत्य’ बांधून, मनशक्ती प्रयोगकेंद्र त्यावर गेली अनेक वर्षे यशस्वीरित्या प्रयोग करीत आहे.
विशेषत: विद्यार्थ्यांच्या बाबतती, ते जेव्हा अवघड विषयाचा अभ्यास करतात किंवा त्यांनी नुसता त्या अवघड विषयाचा विचार जरी केला, तरी मेंदूतील या सहापैकी एका स्थानातून जास्त उष्णता बाहेर पडते. ते स्थान अचूकपणे टिपणारे, वैशिष्ट्यपूर्ण ‘बायो-थर्मल यंत्र’, मनशक्ती प्रयोगकेंद्राने विकसित केले आहे. या यंत्राद्वारे घेतल्या जाणाऱ्या चाचणीस ‘बायो-थर्मल चाचणी’ असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांना त्याचा अवघड विषय सोपा होण्यासाठी, त्याचा खूप फायदा होतो, असा आजवरचा अनुभव आहे.
बऱ्याचदा पालकांची तक्रार असते की, ‘आमचा मुलगा/ मुलगी एरवी हुशार आहे, परंतु विशिष्ट विषय त्याला अवघड जातो. त्या विषयाचा अभ्यास करताना, त्याला कंटाळा येतो, मनावर ताण पडतो, त्या विषयाचे चटकन आकलन होत नाही, इत्यादी, इत्यादी. ‘ अशावेळी ही चाचणी उपयुक्त ठरते. त्याद्वारे, विद्यार्थ्याला, अभ्यास करताना कुठल्या मेंदूभागात ताण जास्त पडतो याची निश्र्चिती करून, तो कमी करण्यासाठी सविस्तर उपाय-मार्गदर्शन केले जाते.

जून-जुलैच्या प्रारंभी शाळा-कॉलेजेस सुरू होतानाच्या काळात ही चाचणी घेतल्यास, विद्यार्थ्यांना पुढे वर्षभर त्याचा अधिक लाभ होऊ शकतो.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView