बुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम: एक संख्यात्मक दृष्टिकोन

Effect Of Prayer on Fetus

लेखक:
* श्री. गजानन केळकर, एम्.टेक.
* डॉ. अमिता धर्माधिकारी, पीएच्.डी.
* डॉ. अविनाश धर्माधिकारी, पीएच्.डी.

उद्दिष्ट:
या अभ्यासाचा उद्देश असा होता की, ‘चांगले विचार’ - ज्याला ‘प्रार्थना’ म्हणतात - त्याचा परिणाम, तिसऱ्र्या तिमाहीतील गर्भावर, गर्भधारी मातेवर आणि पित्यावर काय होतो, याची पडताळणी करणे.

या प्रयोगात थोर विचारवंत, तत्वज्ञ व ज्यांनी नि:स्वार्थ वृत्तीने आपले संपूर्ण आयुष्य समाज कल्याणासाठी वाहून घेतले त्या आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांच्या आवाजातील ‘प्रार्थना’, संबंधितांना ऐकविण्यात आली. ज्या कुटुंबांवर हा प्रार्थना-प्रयोग केला गेला, त्यांचा स्वामीजींशी पूर्वपरिचय नव्हता.

सदर अभ्यासात, एकूण १,८५० केसेस्चे सूक्ष्म विश्लेजषण करण्यात आले. या अभ्यासाचे गृहीतक असे होते की, ‘‘गर्भ, माता आणि पित्यासाठी केलेली प्रार्थना परिणामकारक ठरु शकते, कारण, ती क्वॉंटम् मेकॅनिक्समधील ‘दुरुन परिणाम करता येतो’ (spooky action at a distance) या प्रक्रियेशी मिळती जुळती आहे.’’

सर्व १,८५० केसेसमध्ये, गर्भाची हृदयगती, मातेची व पित्याची नाडीगती, ही प्रार्थनापूर्व आणि प्रार्थनेनंतर मोजण्यात आली. (हृदयगती आणि नाडीगती ही व्यक्तीची भावनिक स्थिती व गरज यांचे संवेदनशील निर्देशक असते.) प्रार्थनेमुळे गर्भाच्या हृदयगतीवर व मातेच्या व पित्याच्या नाडीगतीवर निश्चितपणे चांगला परिणाम होतो, असा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

तसेच, गर्भ, माता व पिता या तिघांच्याही बाबतीत, स्थिरतेचा एक आकृतीबंध आढळून आला; तो असा - ‘प्रार्थनेपूर्वी ज्यांची नाडीगती नॉर्मलपेक्षा खूप कमी होती, ती प्रार्थनेनंतर, (नॉर्मल रेंजकडे) वाढण्याकडे कल राहिला. प्रार्थनेपूर्वी ज्यांची नाडीगती नॉर्मलपेक्षा खूप जास्त होती, ती प्रार्थनेनंतर, (नॉर्मल रेंजकडे) कमी होण्याकडे कल राहिला. व प्रार्थनेपूर्वी ज्यांची नाडीगती नॉर्मल रेंजमध्ये होती, ती प्रार्थनेनंतर, नॉर्मल रेंजमध्येच राहिली.’

(महत्वाचे: संपूर्ण शोधनिबंध वाचण्यासाठी खालील अटॅचमेंट डाउनलोड करा.)

AttachmentSize
Effect of Rational Prayer on Fetus and Mother_Marathi Paper.pdf268.15 KB

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView