सायको-फीडबॅक उपचारपध्दती

Psychofeedback-Therapy HPM

विशेषत: कर्तबगार, अधिकारी व अन्य व्यक्तींसाठी, भारतात प्रथमच, विख्यात ‘मनशक्ती ‘प्रयोगकेंद्राची अभिनव

सायको-फीडबॅक उपचारपध्दती

- हृदयरोग, मधुमेह
- रक्तदाब, हायपरटेंशन
- डिप्रेशन, निद्रानाश
- चिंता / फोबिक डिसऑडर्स
- ताणतणाव
इत्यादींवर ही उपचारपध्दती विशेष उपयुक्त!
Psycho Feedback Therapy‘मनशक्ती ‘ प्रयोगकेंद्राचे संस्थापक, प्रथमचिंतक स्वामी विज्ञानानंद यांनी मन:शांतीसाठी एक अभिनव कल्पना प्रथम मांडली, ती म्हणजे

‘हॉस्पिटल फॉर पीस ऑफ माईंड'

शरीरव्याधींसाठी जसे हॉस्पिटल असते, तसे हे मनातून निर्माण होणाऱ्या शारीरिक व मानसिक व्याधींसाठीचे ‘हॉस्पिटल फॉर पीस ऑफ माईंड ‘!
सध्या जवळजवळ नव्वद टक्के रोग हे ‘सायकोसोमॅटिक डिसिजेस ‘ (मनोकायिक आजार) म्हणून गणले जातात. त्याचा अर्थ, रोगाचे मूळ कारण हे आपल्या मनातच दडलेले असते. अशा या मनाच्या शक्तीला, फीडबॅक (पुनर्मेळ) प्रक्रियेद्वारे संतुलित करून मन:शक्ती आणि मन:शांती मिळवण्यासाठी, ‘हॉस्पिटल फॉर पीस ऑफ माईंड ‘ने ‘सायको-फीडबॅक उपचारपध्दती ‘ उपलब्ध केली आहे. ‘मनशक्तीच्या ‘अत्याधुनिक ‘सायको-फीडबॅक यंत्रा ‘वर सदर फीडबॅक घेता येऊ शकेल. थोडक्यात, सायको-फीडबॅक म्हणजे, यंत्राद्वारे मानसशक्तीचा पुनर्मेळ घालणे.
तुमच्या डॉक्टराच्या औषधाला, प्रार्थना व मन:शांतीच्या उपायांची जोड द्या.

‘सायको-फीडबॅक ‘म्हणजे ‘मानसशक्ती पुनर्मेळ'

‘सायको-फीडबॅक उपचारपध्दतीत’ तुम्हाला कुठलेच नवीन औषध सुचविले जात नाही, किंवा चालू असलेले औषधही थांबविले जात नाही. त्याउलट, केवळ तुमच्या मनाच्या शक्तीचा वापर दु:ख निवारणासाठी केला जातो!
मनामध्ये येणाऱ्या विचारांचा, भावनांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. उदाहणार्थ, राग आला की आपली नाडीगती वाढते, चेहरा लाल होतो, इत्यादी. रागामुळे किंवा कोणत्याही भावनाक्षोभामुळे, आपल्या शरीरात जे विविध प्रकारचे गतीबदल होतात त्यापैकी काही प्रमुख असे -
- इइजी (मेंदूलहरी)
- इसीजी (हृदयसंबंधी लहरी)
- इएमजी (स्नायूंमधील तणाव)
- त्वचा-निराध (स्किन रेझिस्टन्स)
- श्र्वासगती (ब्रीथ-रेट)
- रक्तदाब (ब्लडप्रेशर), इत्यादी.
राग किंवा भावनाक्षोभाच्या क्षणाला, हे सर्वच शारीरिक बदल आपल्याला कळतात असे नाही. किंबहुना बऱ्याचवेळा शरीरात असे काही बदल घडतात, याचीसुध्दा आपल्याला जाणीव होत नाही. सायको-फीडबॅक पध्दतीमध्ये, यंत्राद्वारे, शरीरातील या विविध प्रकारच्या गतींबद्दलची जाणीव (किंवा फीडबॅक), दृक्श्राव्य पध्दतीने व्यक्तिला करून दिली जाते. अशा प्रकारच्या जाणीवपूर्वक निरीक्षणामुळे, शरीरातील विविध गती आपोआप संतुलित होतात.
तसेच, या वैशिष्ट्यपूर्ण फीडबॅकच्या सहाय्याने, स्वत:त योग्य असे मानसशक्ती-संतुलन निर्माण करण्यासाठी, विशिष्ट उपया संागितले जातात.
रोगाबरोबरच ‘रोग्याला’ही बरं करणं महत्त्वाचं
‘सायको-फीडबॅक उपचारपध्दती’ अशी आहे
पाहा
(स्वत:चे ‘अंतरंग’ताणामुळे निर्माण होणाऱ्या ‘मेंदूलहरी’ व अन्य शारीरिक गती पाहा.)
बदला
(‘स्वत:ला’. ताणाच्या मेंदूलहरी व शारीरिक गती बदलण्याचे प्रशिक्षण घ्या.)
‘मुक्त व्हा’!!
(ताण-तणावापासून.)
वैशिष्ट्ये
- इइजी (मेंदूलहरी), इसीजी (हृदयासंबंधी), इएमजी (स्नायू-तणाव), इत्यादी फीडबॅक
- श्वासगती नियंत्रणातून मनःशांती
- ‘शरीर-पेशीं’ची प्रार्थना
- ‘न्यू वे’चे रोगमुक्तीवरील साहित्य
- संगीतोपचार
- वैयक्तिक व सामुायिक ‘ध्यान’.
- ‘सर्वंकष’ आहार
- निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम
- प्रयोगकेंद्रातील अत्याधुनिक ‘चाचणी कक्ष’

ताण घालवायचा आहे का?

मग निसर्गरम्य लोणावळ्यास या;
निम्मा ताण नाहिसा होईल!
लोणावळ्यातही ‘मनशक्ती’ प्रयोगकेंद्रात या;
उरलेला ताणही निघून जाईल!!

ही कविता नसून वास्तव आहे!
‘मनशक्ती’ प्रयोगकेंद्राच्या ‘हॉस्पिटल फॉर पीस ऑफ माईंड’ मध्ये, सायको-फीडबॅक उपचारांची सोय आता उपलब्ध झाली आहे. यातील वैशिष्ट्य म्हणजे या उपचारांशी तज्ञांचा गट निगडीत असेल. मेंदूशास्त्र, हृदयगतीशास्त्र, मानसशास्त्र, आहारशास्त्र, डायबेटॉलॉजी, सर्वसामान्य आरोग्य, इत्यादी क्षेत्रातील आघाडीचे तज्ञ या गटामध्ये असतील. त्यांच्या मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून मिळू शकेल. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधाः फोन नं. +९१-२११४-२३४३२०; २३४३२१ (सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२) किंवा ईमेलः gsk@manashakti.org

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView