अखंड रडणे

Date: 
रवि, 4 डिसें 2011

मना वासना चूकवी येरझारा।
मना कामना सांडि रे द्रव्यदारा।।
मना यातना थोर हे गर्भवासी।
मना सज्जना भेटवीं राघवासी।।21।।
मागल्या श्लोकात जन्माच्या वेळच्या यातना आणि माया यांचे ज्ञान मनाला करून दिलेले आहे. हे ज्ञान ध्यानात ठेवले की, मनुष्य संयमाने वागू लागेल. हा संयम, घोर यमयातनांपासून मनाला रामापर्यंत पोहचवील.
म्हणून श्रीरामदास या श्लोकात पुन्हा ठसवतात की, जन्माला येताना घोर यातनेतून जावे लागते.
संत आणि पंडित सांगतात की, मनुष्य चारी टोकाला रडत असतो. जीव जाताना जग सोडायचे म्हणून रडतो. जग सोडल्यावर स्वर्गसुखाऐवजी
मागल्या नातेवाईकांच्या आठवणी काढून रडतो. पुन्हा स्वर्गातले वास्तव्य संपले म्हणजे तिसऱ्या टोकाला स्वर्ग सोडावा लागणार म्हणून रडतो. आणि या टोकाला आधी नऊ महिने, रक्त, मांस, घाण यांच्यामध्ये उलटा टांगून घेतो. पुन्हा विचारतो, : मागल्या रडण्याला पुरावा काय?”
म्हणून रामदासांनी जन्मापूर्वीचा सर्व ज्ञात पुरावरा शहाण्यांच्या स्वाधीन केला आणि त्यातून मार्ग सांगितला की, चौफेर चमत्कारिक रडकथा सुटायची असेल, तर मनाची व राघवाची भेट घातली पाहिजे. (मृत्यूनंतरचे अस्तित्व - अधिक संदर्भ पहा - ‘गीता साम्य विज्ञान खंड - 1 उपसंहार’) मनाचा पुढला श्लोक त्या राघवाचे सामर्थ्य सांगत आहे.
मानस ज्ञानेश्वर
(’भाग्यस्वप्न मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 7, श्लो.28ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
मागे पुण्याचे धावा घेतले। आणि माझी जवळीक पातले।
किंबहुना ते चुकले। वाटवधेया।।147।।
आणि मग जे पुण्याच्या बळाने धाव ठोकतात आणि माझ्या समीप येऊन ठेपतात, त्यांची गोष्ट काय सांगावी? ते कामक्रोधादि वाटमाऱ्यांच्या हातून निर्वेध सुटून जातात.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView