अखेरच्या उपायाकडे

Date: 
रवि, 6 एप्रिल 2014

अविद्यागुणें मानवा ऊमजेना।
भ्रमें चुकले हीत ते आकळेना।
परीक्षेंविणें बांधले दृढ नाणे।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणे।।143।।

142वा श्र्लोकही एक पुनरुक्ती होते. 29व्या श्र्लोकापासून मांडलेल्या श्र्लोकांचा शेवट 144व्या श्र्लोकापर्यंत होतो. त्या आधी ठसठशीत दिलेला इशार म्हणजे 132वा श्र्लोक होता. तो इशार दिल्यावर आता 143वा श्र्लोक पुन्हा सत्यशोधनाची तयारी करीत आहे. ती तयारी केल्यानंतर श्रीरामदास म्हणत आहेत की, ‘पहा! माणसाला विद्या येत नाही म्हणून तो अज्ञानी राहतो. ‘अज्ञानी माणसाला भ्रम निर्माण होतोच. मग त्यातून होणाऱ्या चुका करावयास त्याला मार्ग तरी कोणता? आणि मग साहजिकच स्वत: जवळची एखादी कवडी किंमतीची वस्तू मोलाची म्हणून अज्ञानी मनुष्य हट्ट धरून बसतो. अमेरिका आणि अफ्रिका येथील मूळच्या लोकांपैकी काही सोन्याचा वापर व्यवहारात सर्रास करीत असत. युरोपीय व्यापाऱ्यांनी त्यांच्याजवळचे सोने घेतले. त्याच्या बदल्यात त्यांना क्षुल्लक वस्तू दिल्या. चकचकीत मणी आणि अशाच क्षुल्लक वस्तूंच्या मोबदल्यात मौल्यवान सोने ते लोक देत असत. भौतिक अज्ञान जर एवढा तोटा करते, तर आध्यात्मिक अज्ञान केवढा तोटा करील? म्हणून अतंर्शक्तीचे खरे ज्ञान करून घ्या. ते ज्ञान करून घेण्याचा, या संदर्भातील अखेरचा उपाय पुढल्या श्र्लोकात आपल्या हाती येईल.

मनोबोधाचे ओवीरूप
बहुत देवांस नवस केले। बहुत गोसावी धुंडिले।
गटागटा गिळले। सगळे विंचू।।
केले समंधाचे सायास। राहाणें घातले बहुवस।
केळें नारिकेळें ब्राह्मणास। अंब्रदाने दिधली।
केली नाना कवटाले। पुत्रलोभे केली ढाले।
तरी अदृष्ट फिरलें। पुत्र नाही।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView